Michael Jackson Death Anniversary: टायगर श्रॉफ ने 'खलीबली' गाण्यावर मायकल जॅक्सन च्या अंदाजात थिरकत दिली श्रद्धांजली (Watch Video)
Tiger Shroff (Photo Credits: Instagram)

Moonwalk सोबतच आपल्या खास डान्स मुव्हसमुळे जगभरात लोकप्रियतेच्या शिखरावर गेलेल्या मायकल जॅक्सनची (Michael Jackson) आज 10 वी पुण्यतिथी आहे. मायकल जॅक्सनचे चाहते जगभरात पसरले आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील त्याला अपवाद नाही.आज मायकल जॅक्सनच्या पुण्यतिथीदिनी त्यांच्या खास अंदाजात टायगर श्रॉफने (Tiger Shroff) डान्स केला आहे. त्याचा व्हिडिओ टायगरने इंस्टाग्रामवर शेअरदेखील केला आहे.

'पद्मावत' सिनेमातील गाण्यावर टायगरचा डान्स

'पद्मावत' या संजय लीला भंसाळी दिग्दर्शित सिनेमामध्ये रणवीर सिंग 'खलीबली..' गाण्यावर रावडी अंदाजात नाचला होता. याच गाण्यावर टायगर श्रॉफने मायकल जॅक्सन स्टाईलमध्ये डान्स केला आहे.

टायगरने हा व्हिडिओ पोस्ट करताना ' मायकल जॅक्सनला या जगाचा निरोप घेऊन 9 वर्ष झालीत यावर विश्वास बसत नाही. खिल्जीनेही तुला त्याच आसन दिलं असेल. ' अशा आशयाची पोस्ट केली आहे. मायकल जॅक्सनचा मृत्यू कार्डिएक अरेस्टमुळे झाला.