Bharat Trailer Memes (Photo Credits: Instagram)

Bharat Trailer Memes: सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या 'भारत' (Bharat) सिनेमाचा ट्रेलर कालच (22 एप्रिल, सोमवार) प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा ट्रेलर जरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असला तरी नेटकऱ्यांनी यावर मीम्स (Memes) बनवण्याची संधी काही सोडलेली नाही. सलमान आणि कतरिना यांच्यातील खास संवादावर अनेक मजेशीर मीम्स सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. ट्रेलरमध्ये एका सीनमध्ये कतरिना सलमानला म्हणते, "इतने भारी ज्ञान की जरुरत बिल्कुल नही है." यावर डायलॉगवर नेटकऱ्यांनी धमाल मीम्स बनवले आहेत. याशिवायही काही मीम्स सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहेत. (भारत सिनेमाचं मोशन पोस्टर आऊट! 'सलमान खान' ने शेअर केला एका दशकातील 5 हट्के लुक्स मधील प्रवास)

भारत ट्रेलर मीम्स:

 

ट्रेलरमध्ये सलमान खान अनेक वेगवेगळ्या अवतारात दिसतो. त्याचबरोबर कतरिना कैफ देखील वेगळ्या रुपात दिसत आहे. अभिनेता जॅकी श्रॉफ सिनेमात सलमानच्या वडीलांची भूमिका साकारत आहे. याशिवाय या सिनेमात दिशा पटानी, सुनील ग्रोवर आणि तब्बू हे कलाकार आहेत. अली अब्बास जफर दिग्दर्शित भारत सिनेमा 5 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.