Mard Maratha Song in Panipat: मराठेशाहीच्या मराठी बाण्याचे महत्व सांगणारे संगीतकार अजय-अतुल यांच्या यांच्या खास शैलीतील पानिपत मधील 'मर्द मराठा' गाणे प्रदर्शित, एकदा ऐकाच
Mard Maratha Song in Panipat (Photo Credits: YouTube)

लगान, जोधा अकबर, मोहेंजोदारो सारखे एकाहून एक असे सरस चित्रपट देणारे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowariker)  लवकरच 'पानिपत' (Panipat- The Great Betrayal) हा नवा सिनेमा घेऊन येत आहे. या चित्रपटामधून पानिपतच्या तिसऱ्या लढाईचा इतिहास मांडणार आहेत. अर्जुन कपूर (Arjun Kapoor), क्रिती सेनॉन (Kriti Sanon), संजय दत्त (Sanjay Dutt) यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 6 डिसेंबरला आपल्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरनंतर बराच चर्चेत आलेल्या या चित्रपटाचे 'मर्द मराठा' हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

हे गाणे जावेद अख्तर यांनी लिहिले असून अजय अतुल ही जोडी या गाण्याचे संगीतकार आहे. मराठेशाहीच्या मराठी बाण्याचे महत्व सांगणा-या या गाण्याला स्वत: अजय-अतुल, सुदेश भोसले, कुणाल गांजावाल, स्वप्निल बांदोडकर, पद्मनाभ गायकवाड, प्रियांका बर्वे या दिग्गज गायकांनी गायिले आहे. पाहा व्हिडिओ

हेदेखील पाहा- पानिपत सिनेमाचा ट्रेलर पाहून राज ठाकरे यांची आश्चर्यकारक प्रतिक्रिया, पहा ट्विट

या गाण्यातील मोठमोठाले सेट्स, नर्तक-नर्तिकांची संख्या हे सर्व डोळे दिपून टाकणारे आहे. अभिनेत्री क्रिती सेनन पार्वती बाईंची भूमिका साकारत आहे, तर संजय दत्त या चित्रपटात अफगाणिस्तानचा शासक अहमद शहा अब्दालीच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात पद्मिनी कोल्हापुरे, मोहनीश बहल, कुणाल कपूर, सुहासिनी मुळे, रवींद्र महाजनी, झीनत अमान, गश्मीर महाजनी इ. कलाकार महत्वाच्या भूमिकेत आहेत.

नेहमी प्रमाणेच आशुतोष गोवारीकरच्या या ही चित्रपटाचे कला दिग्दर्शन नितीन चंद्रकांत देसाई यांचे आहे. त्यामुळे आशुतोष आणि नितीन सरदेसाई यांची भन्नाट जोडी आणि सोबतीला अजय-अतुल यांची जोडी काय नवीन कमाल करतील ते येत्या 6 डिसेंबरला कळेल.