Sanjay Dutt ने गिफ्ट केलेले 100 कोटींचे 4 फ्लॅट्स Manyata Dutt ने केले परत; 'हे' आहे कारण
Sanjay Dutt & Manyata Dutt (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याला चाहत्यांच्या प्रेमासोबतच कुटुंबियांचे प्रेम देखील भरभरुन मिळाले आहे. पत्नी मान्यता दत्त (Manyata Dutt) आणि मुलांसोबतच फोटो संजय सोशल मीडियावर शेअर करत असतो. यातून त्यांच्यातील बॉन्डिंगचा अंदाज येतो. अलिकडेच संजय दत्त याने पत्नी मान्यताला महागडे गिफ्ट्स दिल्याची जोरदार चर्चा होती. मीडिया रिपोर्टनुसार, संजय दत्तने पत्नी मान्यताला 4 फ्लट्स गिफ्ट केले होते. याची किंमत जवळपास 100 कोटी इतकी आहे. मात्र मान्यताने हे गिफ्ट्स संजय दत्तला परत केले. (Sanjay Dutt Health Update: ‘Prithiviraj’ आणि ‘KGF Chapter 2’ या चित्रपटांमधील संजय दत्त याच्या अॅक्शन सीनपासून प्रेक्षकांना मुकावे लागणार? वाचा सविस्तर)

रिपोर्टनुसार, 23 डिसेंबर 2020 रोजी संजयने मान्यताला हे फ्लॅट्स गिफ्ट केले होते. मात्र ठीक 6 दिवसांनंतर (29 डिसेंबर) तिने ते फ्लॅट्स त्याला परत केले. हे चारही फ्लॅट्स एकाच इमारतीत आहेत. या इमारतीचे नाव इंपीरियल हायईट्स असे असून तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर हे फ्लॅट्स आहेत. या फ्लॅट्सची किंमत सुमारे 100 कोटी इतकी आहे. या फ्लॅट्ससोबत 17 गाड्यांची पार्किंग स्पेस देखील देण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Maanayata Dutt (@maanayata)

परंतु, टॅक्स संबंधित कारणावरुन मान्यताने हे फ्लॅट्स संजय दत्तला परत केले. या फ्लॅट्सवर त्यांना भरभक्कम टॅक्स द्यावा लागला असता. दरम्यान, इम्पीरियल हायईट्स या इमारतीत बॉलिवूड आणि ग्लॅमर विश्वातील अनेक लोक राहतात.

काही महिन्यांपूर्वी संजय दत्त याला फुफ्फुसाच्या कॅन्सरचे निदान झाले होते. त्यावर मात केल्यानंतर लवकरच साऊथ सुपरस्टार यश सोबत केजीएफ 2 मध्ये झळकेल. सिनेमातील त्याचा अधीरा लूक सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. याशिवाय या सिनेमात रवीना टंडन आणि प्रकाश राज देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत असणार आहेत.