जगप्रसिद्ध वोग मॅगझीनसाठी गौरी खान ने पहिल्यांदाच शेअर केले मन्नत चे आतील फोटो, पाहा गौरी खानचे मन्नत मधील हॉट फोटोशूट
Gauri Khan (Photo Credits: INSTAGRAM)

प्रत्येक चाहत्याचे स्वप्न असते की, आपण ज्या कलाकारावर प्रेम करतो, त्याच्या आलिशान बंगल्याचे आतील फोटो पाहता यावे. त्यात बॉलिवूड चाहते तर रात्रंदिवस आपल्या आवडत्या कलाकाराला पाहण्यासाठी त्यांच्या बंगल्याबाहेर उभे असतात. आपला आवडता कलाकार कसा राहत असेल, काय खात असेल आणि मुख्य म्हणजे त्याचा आलिशान बंगला कसा असेल हे जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. अशातच जर तुम्हाला बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) मुंबईस्थित जन्नत बंगल्याचे आतले फोटो तुम्हाला पाहायला मिळाले तर? विश्वासात बसत नाहीए ना पण हे खरे आहे.

शाहरुखची पत्नी गौरी खान (Gauri Khan) हिने नुकतेच जगप्रसिद्ध मासिक 'वोग' (Vogue Magazine) च्या फोटोशूटसाठी चक्क आपल्या बंगल्याची निवड करुन आपल्या आलिशान बंगल्याचे फोटो पहिल्यांदाच शेअर केले आहे.

गौरीने ‘मन्नत’ (Mannat) च्या वेगवेगळ्या भागात फोटोशूट केले आहे. या फोटोशूटचे काही फोटो गौरीने सोशल मीडियावरही शेअर केले आहेत. ‘घरातील सुंदर व्यक्तिंमुळे घर सुंदर बनते,’असे हे फोटो शेअर करताना तिने लिहिले आहे.

गौरी खान ही उत्कृष्ट इंटीरियर डेकोरेटर आहे. त्यामुळे इतरांची घरे सजवणारी स्वत:चे घर सजवण्याबाबत किती आग्रही असेल हे वेगळं सांगायची गरज नाही. मुलांची आणि पतीची आवड ध्यानात घेऊन गौरीने ‘मन्नत’ डिझाईन केले आहे. यासाठी चार वर्षांचा कालावधी लागला. जगभरातील प्रवासादरम्यान तिने एकापेक्षा एक सुंदर वस्तूंची खरेदी केली आणि आपले घर सजवले असे तिने एका मुलाखतीत म्हटले आहे.

हेही वाचा- गौरी खान हिने सोशल मिडीयावर पोस्ट केला Nude फोटो; नेटकऱ्यांनी सुनावले- 'नग्नतेला प्रोत्साहन देऊन नको' (Photos)

गौरीने आतापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांच्या घरांचे इंटीरियरही केले आहे. करण जोहरच्या मुलांची रूम तिनेच सजवली होती. याशिवाय रणबीर कपूर, वरूण धवन आणि जॅकलिन फर्नांडिस, सिद्धार्थ मल्होत्रा यांच्याही घरांचे इंटिरियर केले होते.