Actor Shah Rukh Khan along with his wife Gauri Khan. (File Photo: IANS)

गौरी खान (Gauri Khan) आणि शाहरुख खान हे बॉलिवूडमधील एक आदर्श कपल मानले जाते. शाहरुखने अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे, तर गौरी खान ही प्रसिद्ध इंटेरियर डिझाईनर (Interior Designer) म्हणून नाव कमावत आहे. मार्केटिंगसाठी गौरी आपल्या कामाचे अनेक फोटोज सोशल मिडीयावर पोस्ट करत असते. असाच एक फोटो पोस्ट करून गौरी फसली आहे, कारण या फोटोमुळे नेटकऱ्यांनी गौरीला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

गौरीने एक प्राचीन कलाकृती असलेल्या पेंटिंगचा फोटो शेअर केला होता. गौरीने ट्विटरवर या पेंटिंगचा फोटो शेअर करताना, ‘ब्लॅक ड्रामा #robertoferri #interiordesign #design #decor’ असे कॅप्शन दिले आहे. मात्र हा फोटो अश्लील असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. याबाबत लोकांना गौरीला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. अनेक जणांनी या फोटोखाली कमेंट करत अशा प्रकारचा फोटो घरात लावणे कसे चुकीचे आहे ते सांगितले आहे.

गौरी इंटेरियर डिझायनर आहे, त्यामुळे आपल्या कामांत ती नवनवीन कल्पक गोष्टींचा वापर करत आहे. ही पेंटिंग गौरीच्या घरातील आहे. या पेंटिंगद्वारे गौरी नग्नातेला प्रोत्साहन देत आहे असे अनेक लोकांनी कमेंटद्वारे सांगितले आहे. काही लोकांनी तर गौरीने लावलेल्या या पेंटिंगमुळे शाहरुखचे नाव खराब होऊ शकते. अशा प्रकारे अनेक नकारात्मकत कमेंट्स आल्यावर गौरीने ही पोस्ट आणि हा फोटो सोशल मिडीयावरून काढून टाकला आहे.