मल्याळम चित्रपट दिग्दर्शक (Malayalam Film Director) रंजित (Ranjith) यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आणखी एक गंभीर आरोप (Sexual Assault Allegation) झाला आहे. एका तरुण अभिनेत्रीने दिग्दर्शकाने केलेल्या अत्याचारावरुन नव्याने आरोप केले असून तक्रारही दाखल केलीआहे. ज्यामध्ये तिने म्हटले आहे की, सन 1012 मध्ये या दिग्दर्शकाने तिला ऑडिशनच्या नावाखाली बंगळुरु येथील हॉटेलवर नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला. तिला जबरदस्तीने विवस्त्र होण्यास सांगण्यात आले. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पीडितेने म्हटले आहे की, अत्याचार केल्यानंतर याची कोठे वाच्यता होऊ नये, यासाठी तिला दुसऱ्या दिवशी पैशाची ऑफरही देण्यात आली. एका चित्रटात भूमिका देण्यासाठी त्याला आपल्याकडून बरेच काही हवे होते. या आरोपांनंतर मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये (Malayalam Cinema) खळळ उडाली आहे.
विवस्त्र होण्यासाठी दबाब
अभिनेत्रीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मल्याळम सिनेमा दिग्दर्शकाने आपल्याला हॉटेलच्या खोलीमध्ये विवस्त्र होण्यास सांगितले. आपण त्यास विरोध केला असता हा ऑडिशनचा भाग असल्याचे तिला सांगण्यात आले. ही ऑडिशन चांगल्याप्रकारे दिल्यास तिला आगामी चित्रपटात चांगली भूमिका देण्यात येईल, असेही सांगण्यात आले. दरम्यान, सदर घटनेबाबत केरळ पोलीस महासंचालकांकडे ही तक्रार करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की विशेष तपास पथक (SIT) तक्रारीचे कसून मूल्यांकन करेल आणि योग्य कारवाई करेल. (हेही वाचा, Mass Resignation in AMMA: मल्याळम मूव्ही आर्टिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मोहनलाल यांचा राजीनामा; Justice Hema Committee अहवालानंतर अनेकांनी सोडली पदे)
मल्याळी चित्रपटसृष्टीत आरोपांची माळ
सृष्टीतील प्रख्यात चित्रपट निर्माते आणि सध्या केरळ चालचित्र अकादमीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले रंजीत यांना अलीकडेच अशाच प्रकारच्या अनेक आरोपांना सामोरे जावे लागले आहे. बंगाली अभिनेत्री श्रीलेखा मित्रा हिने 24 ऑगस्ट रोजी एका चित्रपट प्रकल्पाच्या चर्चेदरम्यान त्यांच्यावर "गैरवर्तन" केल्याचा आरोप केला होता. तिने सांगितले की, एका चित्रपटाच्या स्क्रिप्टवर चर्चा करत असताना मला अस्वस्थ वाटेल असे वर्तन करण्यात आले. वृत्तसंस्था पीटीआयसोबत बोताना तिने आपल्यासोबत घडलेल्या घटनांवर प्रकाश टाकला. केवळ रंजीतच नव्हे तर मल्याळी चित्रपटसृष्टीमध्ये दिग्गज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक कलागार, दिग्दर्शक आणि व्यक्तीमत्वांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ज्याची देशभरात चर्चा सुरु आहे. (हेही वाचा, (हेही वाचा, Mollywood Controversy: कास्टिंग डायरेक्टर Tess Joseph यांच्याकडून अभिनेता Mukesh यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप; मॉलिवडमध्ये खळबळ) )
मल्याळम चित्रपट उद्योगातील व्यापक लैंगिक शोषणाचा पर्दाफाश करणारा न्यायमूर्ती हेमा आयोगाचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर लैंगिक अत्याचारांची अनेक प्रकरणे पुढे आली आहेत. अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाबाबत आवाज उठवला आहे. या आरोपांमुळे मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे. राज्य सरकारनेही या प्रकरणाची दखल घेतली असून, चौकशी करण्यासाठी एक विशेष समिती नेमल्याचे सरकारने म्हटले आहे.