Mohanlal Resigns as AMMA President: मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांनी असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्टिस्ट्स (AMMA) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. न्यायमूर्ती के हेमा समितीच्या (Hema Committee Report) अहवालातील स्फोटक निष्कर्षांनंतर वाढत्या दबाव आणि वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा राजीनामा आला आहे. ज्याने मल्याळम चित्रपट उद्योगात (Malayalam Film Industry) महिलांचा व्यापक गैरवर्तन (Sexual Misconduct) आणि लैंगिक अत्याचार यांबाबतच्या घटनांवर अधिक प्रकाश टाकला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार AMMA च्या कार्यकारी समितीच्या सर्व सदस्यांनीही आपले संयुक्त राजीनामे दिले आहेत.
मल्याळी चित्रपट क्षेत्रास हादरा
हेमा समिती अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर त्यातील धक्कादायक खुलाशांनी मल्याळी चित्रपट उद्योग जगताला धक्का बसला आहे. ज्यामुळे अनेक हाय-प्रोफाइल राजीनामे झाले आहेत. रविवारी, दोन प्रमुख व्यक्ती, दिग्दर्शक रंजित आणि अभिनेता सिद्दीक यांनी अनुक्रमे केरळ चित्रपट अकादमी आणि AMMA मधील त्यांच्या पदावरुन पायउतार झाले. हे राजीनामे लैंगिक गैरवर्तनाच्या गंभीर आरोपांनंतर दिले आहेत, ज्यात सिद्दिकीविरुद्ध एका तरुण अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीचा समावेश आहे. (हेही वाचा, Mollywood Controversy: कास्टिंग डायरेक्टर Tess Joseph यांच्याकडून अभिनेता Mukesh यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप; मॉलिवडमध्ये खळबळ)
विशेष समितीद्वारे प्रकरणाची चौकशी
चित्रपट विश्वातील लैंगिक छळांचीच प्रकरणे पुढे येताच, मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित करत उद्योगक्षेत्रातील महिला कलाकारांवर होणाऱ्या अत्याचाराची चौकशी करण्यासाठी सात सदस्यीय विशेष पथक स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. (हेही वाचा, Malayalam Actress Sexual Assault Case: मल्याळम मुव्ही आर्टिस्टचे सरचिटणीस Siddiqui यांच्यावर गंभीर आरोप, मानसिक आणि शारिरीक अत्याचार केल्याचे अभिनेत्रीची तक्रार)
शम्मी थिलकन यांचे गंभीर आरोप
मल्याळी चित्रपट क्षेत्रामध्ये होत असलल्या लैंगिक छळाचे आरोप आणि पुढे येत असलेल्या प्रकरणांबाबत मोहनलाल यांनी मौन बाळगल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. अभिनेते शम्मी थिलकन यांनी सुपरस्टारवर जाहीर टीका केली आणि म्हटले आहे की, मोहनलालने "प्रतिसाद देण्याची क्षमता गमावली आहे." चुकीच्या कृत्यांसाठी जबाबदार असलेल्यांना शेवटी परिणाम भोगावे लागतील यावर. जे करतात तसेच भरतात. मग ते कोणीही असो, असेही त्यांनी म्हटले आहे.
दिग्दर्शक रंजित यांचाही राजीनामा
अनुचित वर्तन केल्याचा बंगाली अभिनेत्रने आरोप केल्यावर दिग्दर्शक रंजित यांनी केरळ चित्रपट अकादमीच्या प्रमुखपदाचाही राजीनामा दिला आहे. राज्यातील सरकारच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्याच्या इच्छेचा दाखला देतानाच अभिनेते आणि नेते रंजीत यांनी आपला निर्णय एका ऑडिओ क्लिपद्वारे जाहीर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी आपण खरा बळीचा बकरा बनलो असल्याचे म्हटले आहे. दरम्यान,
आपल्यावर झालेले सर्व आरोप फेटाळून लावतानाच त्यांनी आपण लवकरच कायदेशीर कारवाई सुरु करणार आहोत, असे म्हटले आहे.
दरम्यान, अभिनेते-राजकारणी मुकेश यांच्यावरील जुने आरोप देखील वादात सापडले आहेत. आपल्यावरील आरोप नाकारतना त्यांनी सत्ताधारी सीपीआय (एम) पक्षाशी संबंधित असल्यामुळे आरोप निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला आहे.