Malaika Arora च्या 'मुन्नी बदनाम हुई' आयटम साँगचा इंग्लडच्या शालेय अभ्यासक्रमात समावेश; अभिनेत्रीने सोशल मीडियावर दिली माहिती
Malaika Arora (Photo Credits: Instagram)

मलायका अरोरा (Malaika Arora)चे बॉलिवूडमधील हिट गाणे कुणाला माहित नाहीत. मलायकाचे दिल से हो दबंग, छैंया छैंया आणि मुन्नी बदनाम हुई (Munni Badnaam Hui Song) गाणी चित्रपटापेक्षाही सुपरहिट ठरली. आता मलायकाचा हे आयटम साँग इंग्लंडमधील शाळांमध्येही शिकविले जाणार आहेत. यूकेच्या शिक्षण विभागाने मुलांना शास्त्राच्या विविध पैलूंविषयी जागरूक करण्याच्या उद्देशाने शालेय अभ्यासक्रमात भारतीय शास्त्रीय संगीत, बॉलिवूड हिट्स आणि भांगडा बीट्सचा समावेश केला आहे. या बातमीचे कात्रण मलायकाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

इंग्लडमध्ये शुक्रवारी शाळेचा नवीन संगीत अभ्यासक्रम प्रसिद्ध झाला. संगीताच्या या अभ्यासक्रमात बॉलिवूड हिट मुन्नी बदनाम हुई साँग व्यतिरिक्त स्लमडॉग मिलियनेयर चित्रपटाचे गाणे 'जय हो' देखील समाविष्ट आहे. याशिवाय किशोरी आमोणकर यांच्या सहेली रे, अनुष्का शंकरच्या इंड‍ियन समर गाण्याचाही यात समावेश आहे. (वाचा - Shero Teaser: सनी लियोनी ने शेअर केला आपल्या आगामी सायकोलॉजिकल थ्रिलर 'शीरो' चित्रपटाचा टीझर; पहा व्हिडिओ)

दरम्यान, मुन्नी बदनाम हूई हे 2010 मध्ये रिलीज झालेल्या दबंग चित्रपटातील हिट गाणे आहे. या गाण्याला ममता शर्मा आणि ऐश्वर्या यांनी आवाज दिला होता. या गाण्याचे लिरिक्स ललित पंडित यांनी लिहिले होते. मलायका अरोरा इंग्लंडच्या अभ्यासक्रमातील तिच्या गाण्याच्या कर्तृत्वाने खूप आनंदित आहे. मलायकामुळे मुन्नी बदनाम हुई गाणं खूपचं हिट ठरले.

 

Malaika Arora Instagram Story (PC - Instagram)

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

याव्यतिरिक्त मलायकाने यापूर्वीचं चाहत्यांना तिचा ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट फोटो शेअर करुन होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात ती जिमच्या कपड्यांमध्ये दिसली. या पोस्टमध्ये मलायकाने आपल्या चाहत्यांना सुरक्षित होळी साजरी करण्याचा सल्लादेखील दिला.