Malaika Arora (PC - Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही मनोरंजन उद्योगातील फॅशन आयकॉन आहे. तिचा प्रत्येक लूक चाहत्यांना खूप आवडतो. अलीकडेच मलायकाने आपल्या फोटोशूटमधील एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तिच्या या फोटोची खूप चर्चा झाली. विशेष म्हणजे मलायकाच्या या ड्रेसची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे.

मलायका अरोरा हिरव्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसत असल्याचं या फोटोत पाहायला मिळत आहे. तिने बेडवर बसून कॅमेऱ्यासमोर किलर पोज दिली आहे. ज्यामध्ये ती सुंदर दिसत आहे. मलायकाचा हा फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला आहे. मलायकाच्या या ड्रेसची किंमत ऐकून तुम्हीही भारावून जाल. (वाचा -RRR Celebration Anthem Teaser: ज्युनियर एनटीआर, राम चरण आणि आलिया भट्ट देशभक्तीच्या जल्लोषात, पाहा टीझर)

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, हा ड्रेस Millia London च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. परंतु तो खरेदी करण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल. कारण, त्याची किंमत लाखोंमध्ये आहे. मलायकाच्या या ड्रेसची किंमत 2 लाख 40 हजार रुपये आहे. इतकंच नाही तर मलायकाने परिधान केलेल्या सोन्याच्या हिल्सची किंमत ऐकून तुम्ही डोक्याला हात लावाल. रिपोर्ट्सनुसार, मलायकाच्या हिल्सची किंमत 83 हजार रुपये आहे. याला गोल्डी जोली 100 मि.मी. म्हटलं जातं. हे Louboutin वेबसाइटवर उपलब्ध आहे.

अलीकडेचं मलायका अरोराने एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला की, जेव्हा कोणी तिच्या पोस्टवर घाणेरडे कमेंट करते तेव्हा तिचे पालक खूप दुःखी होतात. पण, मलायका पालकांना समजावून शांत करते. पिंकविलाशी झालेल्या संवादादरम्यान मलायकाने सांगितले की, तिने तिच्या पालकांना या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले आहे.