Malaika Arora- Arjun Kapoor Break Up: मलाइका अरोड़ा-अर्जुन कपूर यांच्या नात्यात 4 वर्षानंतर दुरावा, अभिनेत्री आयसोलेशनमध्ये असल्याची माहिती-Reports
Malaika Arora and Arjun Kapoor (Photo Credits-Twitter)

Malaika Arora- Arjun Kapoor Break Up: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोडा आणि अर्जुन कपूर यांच्या रिलेशनशिपची नेहमीच जोरदार चर्चा सुरु असते. दोघांना नेहमी एकमेकांसोबत खुप वेळा स्पॉट करण्यात आले आहे. त्याचसोबत नुकतेच हे कपल्स मालदिव्सला गेल्याचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा समोर आले होते. परंतु काही दिवसांपूर्वी अर्जुन याला मलाइकासोबतच्या रिलेशनशिपवरुन त्या दोघांच्या वयातील अंतरावरुन ट्रोल करण्यात आले होते. मात्र अर्जुन याने ट्रोलर्सला यावरुनगी चांगलेच सुनावले होते. पण आता असे समोर येत आहे की, हे दोघे एकमेकांना 4 वर्ष डेट केल्यानंतर दूरावले गेले आहेत.

बॉलिवूड लाइफ यांच्या मते सुत्रांनी असे म्हटले की, गेल्या सहा दिवसांपासून मलाइका घराच्या बाहेर आलीच नाही आहे. ती पूर्णपणे आयसोलेशनमध्ये गेली आहे. मलाइका खुप दु:खी असून ती जगापासून काही वेळ दूर राहू पाहत आहे. त्याचसोबत अर्जुन सुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये मलाइका हिला भेटण्यासाठी आलेला नाही. अर्जुन कपूर याची बहिण रिया हिच्या घरी डिनरचे आयोजन केले होते. रिया ही मलाइकाच्या घराजवळच राहते. तेव्हा डिनरला अर्जुन आला पण तो मलाइका हिला न भेटता गेला. यापूर्वी दोघे अशा प्रकारच्या फॅमिली डिनरला एकत्रित दिसून आले आहेत. पण यावेळी असे झाले नाही.(लग्नाच्या एका महिन्यानंतर Katrina Kaif हिने पती Vicky Kaushal सोबतचा 'हा' फोटो शेअर करत दिले क्युट कॅप्शन) 

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

अर्जुन कपूर हा नेहमीच मलाइका हिच्या जवळपास असेल असे काहीतरी करतो. परंतु डिनरच्या नंतर असे काही झालेले नाही. अर्जुन थेट आपल्या घरी परतला. तसेच दोघांना एकमेकांसोबत स्पॉट ही सध्या करण्यात आलेले नाही. त्यामुळे या दोघांमध्ये नक्की काय बिनसलय यावर आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे.