29 Years of Saajan: माधुरी दीक्षित हिने आपल्या ‘साजन’ या चित्रपटाला 29 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शेअर केला संजय दत्त आणि सलमान खान सोबतचा हा अविस्मरणीय फोटो
Saajan (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित नेने (Madhuri Dixit Nene) ही सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. आज तिच्या प्रचंड लोकप्रिय झालेल्या ‘साजन’ (Saajan) या चित्रपटाला 29 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तिने सोशल मिडियाच्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त केला आहे. यासाठी तिने तिच्या सोबत या चित्रपटात असलेले कलाकार अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) आणि सलमान खान (Salman Khan) यांच्यासोबत एक दुर्मिळ आणि अविस्मरणीय फोटो आपल्या सोशल अकाउंटवर शेअर करत आपल्या चित्रपटाबाबतच्या आठवणींना उजाळा दिला.

या फोटोंमध्ये माधुरी, संजय दत्त आणि सलमान खान एकत्र दिसत आहे. हा फोटो या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काढला असावा. Sadak 2: आलिया भट्ट-संजय दत्त चा चित्रपट 'सडक 2' ठरला IMDB चे सर्वात कमी रेटिंग मिळालेला सिनेमा

या फोटोंच्या खाली माधुरी दीक्षितने लिहिले आहे की, “साजन ची 20 वर्ष.. या चित्रपटाची कथा वाचल्यानंतर मी लगेचच या चित्रपटात काम करण्याची मनाशी पक्कं केलं होतं. चित्रपटाची कथा रोमँटिक होती. संवाद आणि गाणी तर खूपच अप्रतिम होती. लॉरेंन्स डिसूजा द्वारा निर्मित साजन हा चित्रपट 1991 मध्ये प्रदर्शित झाला होता.”

चित्रपटात अमर आणि आकाश या दोन जिगरी मित्रांची कथा होती. ज्यांना पूजा नावाच्या एका मुलीशी प्रेम होते. माधुरीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, ती 2019 मध्ये ‘कलंक’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात आलिया भट्ट, वरुण धवन, आदित्य रॉय कपूर आणि संजय दत्त हे कलाकार देखील होते. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा तग धरू शकला नाही.