प्रसिद्ध गायक, गीतकार आणि अभिनेते लकी अली यांनी अनएकेडमी अनविंडच्या अखेरच्या अंतिम एपिसोडमध्ये 'ओ सनम' आणि 'गोरी तेरी आखे' हे गाणे गायले. आपल्या उत्कृष्ट अशा गीतांनी प्रेक्षकांना प्रभावित करुन सोडले. त्यांनी एका निराळ्या अंदाजात परफॉर्मन्स देत गाण्याचे बोल आणखी ताजे केले. एका संगीत परिवारातील असलेल्या लकी अली यांनी गाणी त्यांच्या चाहत्यांना त्यामध्ये रमण्यास वेड लावतात.
लकी अली असे मानतात की, एक गीत वास्तविक रुपात कधीच संपत नाही. कारण ही एक निरंतरता आहे. तसेच मी तयार केलेली आणि गायलेली गाणी ही विविध पद्धतीने गात असल्याने ती प्रदर्शित झाल्यानंतर ही त्यामधील गोडवा कायम राहतो.(Smita Patil Birth Anniversary: स्मिता पाटील यांच्या जयंती निमित्त जाणून घ्या काही खास गोष्टी)
शो मध्ये काम करत असलेल्या त्यांच्या अनुभवाबद्दल लकी अली यांनी असे म्हटले की, मी नेहमी प्रमाणेच अतिशय व्यावसायिक पद्धतीने ते केले आहे. हा एक शानदार शो होता. ज्यामध्ये शानदार लाइटिंग सिक्वेंस आणि आमच्यासाठी एकमेकांसोबत विचार करण्यासाठी पुरेशी जागा होती. आमच्यामधील काही लोकांनी यासाठी काम केले होते. मिस्र, दिल्ली आणि धर्मशाला येथून आलेल्या तीन संगीतकारांप्रमाणे पहिल्यांदाच एकमेकांसोबत काम केले.
त्यांनी असे म्हटले की, माझ्यासाठी हा एक खोल अनुभव होता. आम्ही गाण्याचे बोल योग्य नाही तो पर्यंत त्यावर अभ्यास केला. त्याचसोबत आम्ही स्टेजवर सुद्धा गेलो नाही. हे विविध कलाकार, नवे कलाकार यांच्या दरम्यानच्या संबंधाचे एक उत्तम उदाहरण आहे. त्या माहोलमध्ये राहणे माझ्यासाठी माझे सौभाग्य होते. अनएकेडमी अनविंड एमटीवीवर प्रसारित होणार आहे.