20 Years of Kuch Kuch Hota Hai : ग्रँड सेलिब्रेशनचे खास फोटोज !
रानी मुखर्जी, शाहरुख खान,काजोल (Photo Credits: Yogen Shah)

16 ऑक्टोबर 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कुछ कुछ होता है' या सिनेमाला काल 20 वर्ष पूर्ण झाली. या सिनेमातूनच करण जोहरने दिग्दर्शनात पाऊल टाकले. करणचा दिग्दर्शिकीय पर्दापण असलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आणि हा सिनेमा सुपरहिट ठरला. प्रेक्षकांच्या प्रेमाने हा सिनेमा चिरतरुण झाला.

सिनेमाला 20 वर्ष पूर्ण झाल्याने मुंबईत एका ग्रँड पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला शाहरुख खान, काजोल, रानी मुखर्जी, फरीदा जलाल आणि अर्चना पूरनसिंग यांनी हजेरी लावली.

(Photo Credits: Yogen Shah)

त्याचबरोबर सिनेसृष्टीतील इतर स्टार्सही उपस्थित होते. करिना कपूर, नेहा धुपिया, ट्विंकल खन्ना, वरुण धवन, जान्हवी कपूर, ईशान खट्टर, सिद्धार्थ मल्होत्रा, अभिषेक बच्चन, श्वेता नंदा, जतिन पंडीत, ललित पंडीत यांसारख्या कलाकारांची मांदीयाळी होती.

करिना कपूर-खान (Photo Credits: Yogen Shah)

वरुण धवन (Photo Credits: Yogen Shah)

नेहा धूपिया (Photo Credits: Yogen Shah)

(Photo Credits: Yogen Shah)

शाहरुख खान, रानी मुखर्जी आणि काजोल (Photo Credits: Yogen Shah)

अभिषेक बच्चन और श्वेता नंदा (Photo Credits: Yogen Shah)

या इव्हेंटमध्ये काजोल, रानी आणि शाहरुख यांनी यावेळेस सिनेमातील एक प्रसंग रिक्रिएट केला.

पार्टीत सलमान खान सहभागी होऊ शकला नाही. पण त्याने व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आणि पुन्हा एकदा करण जोहरसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.