KRK Arrested: केआरकेला रविवारी एका जुन्या विनयभंग प्रकरणात (Molestation Case) अटक करण्यात आली आहे. कमाल आर खान (Kamal Rashid Khan) याला वर्सोवा पोलिसांनी तीन वर्षे जुन्या प्रकरणात अटक केली आहे. मुंबई वर्सोवा पोलिसांनी केआरकेला जानेवारी 2019 मध्ये तक्रारदाराकडून सेक्सुअल फेवर मागितल्याप्रकरणी अटक केली होती. जानेवारी 2019 च्या पहिल्या आठवड्यात तक्रारदाराचा हात धरून केआरकेने तक्रारदाराकडे सेक्सुअल फेवरची मागणी केल्याचा आरोप आहे. रिपोर्ट्सनुसार, केआरकेला एका अभिनेत्रीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. (हेही वाचा - Kangana Ranaut On Mahesh Bhatt: दिग्दर्शक महेश भट्ट यांचं मूळ नाव अस्लम, अभिनेत्री कंगणा रनौतचा खळबळजनक दावा)
काय आहे नेमकी प्रकरण?
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, 27 वर्षीय तक्रारदार 2017 मध्ये मुंबईत आली होती. तिने पोलिसांना सांगितले की, ती एक अभिनेत्री, गायिका आणि फिटनेस मॉडेल आहे. तिने सांगितले की, 2017 मध्ये घरातील पार्टीदरम्यान तिची केआरकेशी भेट झाली होती. या पार्टीत केआरकेने निर्माता म्हणून स्वतःची ओळख करून दिली आणि त्यानंतर दोघांनी एकमेकांशी फोन नंबरची देवाणघेवाण केली. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, त्याच वर्षी केआरकेने सांगितले की तो तिला इमरान हाश्मी अभिनीत कॅप्टन नवाब नावाच्या चित्रपटात मुख्य भूमिका देईल. त्यानंतर त्याने फोनवर अश्लील टिप्पण्या पाठवल्या.
अभिनेत्रीने आरोप केला की, जानेवारी 2019 मध्ये केआरकेने तिला तिच्या वाढदिवसासाठी त्याच्या बंगल्यावर बोलावले होते. त्या दिवशी ती गेली नसली नाही. पंरतु, त्याच आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7 च्या सुमारास ती त्याच्या बंगल्यावर गेली. अभिनेत्रीने सांगितले की उष्णता खूप आहे, म्हणून तो तिला पहिल्या मजल्यावरील खोलीत घेऊन गेला. केआरकेने तिला वोडका ऑफर केला. मात्र, पीडितेने तो पिण्यास नकार दिला. मग त्याने तिला संत्र्याचा रस दिला आणि तिने तो घेण्यास होकार दिला. ज्यूस प्यायल्याबरोबर तिला चक्कर आल्याचा आरोप अभिनेत्रीने केला. यानंतर खानने तिच्यासोबत सेक्स करण्याचा प्रयत्न केला पण ती घाबरली आणि तेथून निघून गेली. अभिनेत्रीने तिच्या मित्राला कॉल केला. ज्याने सांगितले की केआरकेचा इंडस्ट्रीमध्ये मोठा प्रभाव आहे आणि त्याबद्दल तक्रार केल्याने तिच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो.
पीडितेने सांगितले की, 2021 मध्ये तिने तिच्याबरोबर घडलेला प्रसंग दुसर्या मित्राला सांगितला. ज्याने तिला पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिने वर्सोवा पोलीस स्टेशन गाठले आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 354A (लैंगिक छळ) आणि 509 (शब्द, कृती किंवा हावभाव) अंतर्गत खान विरुद्ध एफआयआर दाखल केला.
दरम्यान, KRK आधीच एका प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे. केआरकेला 29 ऑगस्ट रोजी उशिरा मालाड पोलिसांनी विमानतळावरून अटक केली होती. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. केआरकेने तात्काळ जामिनासाठी अर्ज केला मात्र सुनावणी 2 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी बोरिवली येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात सुनावणी होणार होती, मात्र न्यायाधीश रजेवर असल्याने सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.