मुंबईत(Mumbai) गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले दिसून येत आहे. तसेच पावसाचा तडाखा मुंबईच्या लोकल पासून ते विमान मार्गांवर सुद्धा झाला आहे. याच परिस्थितीत कृती सेनन ही अडकलेली दिसून आली. कृती सेनन ही मुंबईत विमानाने प्रवास करत होती. मात्र विमान तिला अहमदाबाद येथे घेऊन गेल्याचा प्रकार समोर आला आहे.
पावसामुळे काही उड्डाणे रद्द करण्यात आली. मात्र कृती सेनन (Kriti Sanon) हिला मुंबई येथून जांबियाला एका कार्यक्रमासाठी जायचे होते. मात्र हवामान खराब असल्याने कृती ज्या विमानाने प्रवास करत होती ते विमान अहमदाबादच्या दिशेने नंतर वळवण्यात आले. या स्थितीमुळे कृती सेननला मनस्ताप सहन करावा लागला. परंतु अधिक मनस्ताप तिला अहमदाबाद येथील विमानतळावर सहन करावा लागला. कारण कृती जशी विमानतळावरुन बाहेरच्या दिशेने निघाली असता चाहत्यांनी तिच्यासोबत सेल्फी फोटो घेण्यासाठी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती.
परंतु कृती हिला दक्षिण आफ्रिकेतील जांबियातील कार्यक्रमाला उपस्थितील लावणे मुकणार असल्याचे दिसून येत आहे. तर पावसामुळे वातावरण खराब असल्याने काही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.