'चेहरे' चित्रपटातून अभिनेत्री कृति खरबंदाचा पत्ता कट, 'या' अभिनेत्रीची लागली वर्णी
Kriti Kharbanda (Photo Credit - Instagram)

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या आगामी 'चेहरे' (Chehre Movie) या चित्रपटात अभिनेत्री कृति खरबंदा (Kriti Kharbanda) ही मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणार होती. मात्र, कृति आता या चित्रपटातून बाहेर पडली आहे. कृति आणि निर्मात्यामधील वादामुळे तिला चित्रपटातून तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, अशा चर्चा रंगल्या होत्या. परंतु, यावर निर्माती कंपनी 'आनंद पंडित मोशन पिक्चर्स'ने (Anand Pandit Motion Pictures)

स्पष्टीकरण दिलं आहे. यात त्यांनी सांगितलं आहे की, 'कृति बद्दल अनेक चर्चा होत आहेत. पंरतु, एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते की, कृतिने आणि कंपनीने एकमताने चित्रपटाच्या बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. अगदी सामंजस्यपूर्ण निर्णय घेऊनच कृति बाहेर पडली आहे. तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असंही निर्माता कंपनीने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. (हेही वाचा - तब्बल 21 वर्षांचे नाते संपुष्टात; अर्जुन रामपाल आणि मेहेर जेसिया यांच्या घटस्फोटाला कोर्टाची मान्यता)

आनंद पंडित मोशन पिक्चर्स ट्विट - 

कृतिच्या जागी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिची वर्णी लागणार असल्याचं, निर्माता आनंद पंडित यांनी सांगितलं आहे. अंकितानेही यास होकार दिला आहे. 'चेहरे' या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत इमरान हाश्मीही मुख्य भूमिका साकारणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा आहे. 9 नोव्हेंबर रोजी या चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच करण्यात आले होते. हा चित्रपट 24 एप्रिल 2010 ला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - बाहुबली चित्रपटातील भल्लालदेव यांचे वडील दग्गुबाती सुरेश बाबू यांच्या घर आणि स्टुडिओवर आयकर विभागाचा छापा

चेहरे हा चित्रपट एक थरारपट आहे. या चित्रपटाची कथा एका मित्रांच्या ग्रुपवर आधारित असणार आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी एका बड्या उद्योगपतीची भूमिका करणार आहे. तसेच बिग बी वकिलाची भूमिका साकारणार असून रिया चक्रवर्ती, सिद्धांत कपूर, धृतमान चक्रवर्ती, रघुवीर यादव आणि अन्नू कपूर यांच्याही महत्वाच्या भूमिका असणार आहेत.