![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/11/A-380x214.jpg)
लग्नानंतर तब्बल 21 वर्षानंतर अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) आणि मेहेर जेसिया (Mehr Jesia) यांचे नाते संपुष्टात आले आहे. मंगळवारी बांद्रा येथील कौटुंबिक कोर्टाने दोघांच्या घटस्फोटाला (Divorce) परस्पर संमतीने मान्यता दिली. या दोघांनी 30 एप्रिल 2019 रोजी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता, याला न्यायाधीश शैलजा सावंत यांनी सुमारे 6 महिन्यांनंतर विशेष विवाह कायद्यांतर्गत मान्यता दिली. आता त्यांच्या दोन्ही मुली वांद्रे येथील डुप्लेक्समध्ये आपल्या आईसमवेत राहतील.
या दोघांच्या विभक्त होण्याची बातमी प्रथम 2011 मध्ये समोर आली होती, परंतु 28 मे 2018 रोजी याची अधिकृत घोषणा करण्यात आली. अर्जुन रामपालने 1998 मध्ये तत्कालीन सुपर मॉडल मेहर जेसियाशी लग्न केले होते. जेव्हा या नात्याला उतरली कळा लागायला सुरुवात झाली त्याचवेळी, 2009 मध्ये आयपीएल पार्टीमध्ये अर्जुन आणि गॅब्रिएला यांची भेट झाली. हळू हळू ओळख, भेट आणि प्रेम झाले. काही वर्षांनंतर दोघांनी डेटिंग करण्यास सुरवात केली.
(हेही वाचा: हा आहे जगातील सर्वात महागडा घटस्फोट; एका अफेअरमुळे तुटला 25 वर्षांचा संसार)
यावर्षी जुलैमध्ये अर्जुन आणि गॅब्रिएला पालक बनले. गॅब्रिएलाने अर्जुन मुलाला, अरिकला जन्म दिला. मात्र अर्जुनने अद्याप गॅब्रिएलाशी लग्न केले नाही. गॅब्रिएला ही दक्षिण आफ्रिकेची मॉडेल आणि अभिनेत्री आहे. त्याशिवाय गेल्या वर्षी ती एफएचएमच्या 100 सेक्सिएस्ट महिलांच्या यादीत सामील झाली होती. 2015 साली तेलुगु-तमिळ चित्रपटामधून तिने आपल्या करियरची सुरुवात केली होती.