गोव्यानंतर मुंबई मध्ये एकत्र स्पॉट झाले Kim Sharma आणि Leander Peas; पहा Photos
Kim Sharma & Leander Peas (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा (Kim Sharma) आणि टेनिस स्टार लिएंडर पेस (Leander Peas) यांनी अलिकेडच एकत्र सुट्टीचा आनंद घेतला. गोव्यातील त्यांचे व्हॅकेशनचे फोटोज व्हायरल झाल्यानंतर दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र या दोघांनीही याबद्दल अद्याप काही जाहीर केलेले नाही. परंतु, गोव्यानंतर त्यांना आता मुंबईत एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या अफेअर्सच्या चर्चा अधिकच रंगत आहेत. (अभिनेत्री Kim Sharma, टेनिस जगातील स्टार Leander Paes ला करतेय डेट? दोघांचेही रोमॅंटिक फोटो झाले व्हायरल, See Pics)

मुंबईत एकत्र स्पॉट झाल्यानंतरचे त्यांचे फोटोज सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहेत. या फोटोत दोघेही अत्यंत खुश दिसत आहेत. यात लिएंडर ब्लॅक टीशर्ट आणि ब्लू डेनिम मध्ये दिसत आहे. तर किम शर्माने पिवळ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे. यात फोटोत दोघेही कारमध्ये बसताना दिसत आहेत.

पहा फोटोज:

यापूर्वी किम आणि लिएंडर या दोघांचेही नाव दुसरं कोणासोबत जोडले गेले होते.  हर्षवर्धन राणे सोबतच्या रिलेशनशीपमुळे किम शर्मा चर्चेत होती. त्याचबरोबर क्रिकेटपटू युवराज सिंह सोबतचे तिचे नाते फार काळ चर्चेत होते. तर लिएंडर पेस हा संजय दत्तची एक्स वाईफ रिया पिल्लई सोबत रिलेशनशीपमध्ये होता. आता किम-लिएंडर यांचे एकत्र फोटोज पाहून हे आपल्या नात्याबद्दल कधी खुलासा करणार, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.