अभिनेत्री Kim Sharma, टेनिस जगातील स्टार Leander Paes ला करतेय डेट? दोघांचेही रोमॅंटिक फोटो झाले व्हायरल (See Pics)
Kim Sharma & Leander Paes ( Photo Credit - Instagram )

बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की चित्रपट जगतात अभिनेत्रींची करिअर जास्त काळ टिकत नाही. अशा खुप कमी नायिका आहेत ज्या अनेक वर्षानुवर्षे चित्रपटात काम करत आलेल्या आहेत. बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री देखील आहेत ज्यांनी एकतर काही चित्रपटांनंतर लग्न केले किंवा फिल्म जगतापासून दूर गेल्या. त्यांचे चित्रपट कदाचित हिट झाले असतील मात्र तरी त्यांना हवी तेवढी ओळख मिळाली नाही.त्यातलीच एक आहे अभिनेत्री किम शर्मा आहे. किम शर्माने सुपरहिट चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती, मात्र असे असूनही तिला अपेक्षित अशी ओळख मिळू शकली नाही. तिच्या कारकीर्दी पेक्षा किम तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त चर्चेत राहिली. नवरा- घटस्फोट, युवराज सिंगसोबत अफेअर आणि मोलकरीण यांच्यामुळे किमने बरेच अटेंशन मिळवले. आता पुन्हा एकदा किम शर्मा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत आली आहे. (Dia Mirza ने दिला गोंडस मुलाला जन्म, दोन महीने आधीच झाली आई )

टेनिस जगातील सुपरस्टार लिअँडर पेस आणि किम शर्मा यांचे काही सुंदर फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही समुद्र किना-यावर खूपच आनंदी दिसत आहेत. लिअँडर पेस आणि किमचे हे फोटो खुप अफवा पसरवत आहेत. लिअँडर पेस आणि किम शर्मा सध्या गोव्यात एकत्र सुट्टीवर आहेत. या दोघांचे बरेच फोटो व्हायरल होत आहेत.यात दोघेही एकत्र जेवण करताना आणि रोमँटिक स्टाईलमध्येही दिसत आहेत. या फोटो मधील दोघांची शैली पाहून हे स्पष्ट होते की दोघे लवकरच या नात्यास अधिकृत बनवण्याची तयारी करत आहेत.

किम शर्मा तिच्या नात्यांबाबत बर्‍याचदा चर्चेत असते. 2003 साली किम आणि क्रिकेटर युवराज सिंगच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. दोघांचे अफेअर तब्बल चार वर्षे चालले पण त्यानंतर त्यांच्या नात्यात फूट पडू लागली आणि अखेर 2007 साली दोघांचे ब्रेकअप झाले.