'Filmfare' मासिकावरील अभिनेत्री कैटरीना कैफ चे हॉट फोटो चर्चेत
Katrina Kaif Filmfare shoot (Photo Credits: Instagram)

लवकरच 'भारत' (Bharat)  या चित्रपटातून एका वेगळ्या लूकमधून आपल्यासमोर येणारी बॉलिवूडची हॉट अभिनेत्री कैटरीना कैफ (Katrina Kaif) सध्या एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहे. निमित्त आहे. फिल्मफेअर (Filmfare) मासिकाच्या फोटोशूटचं. नुकताच तिने आपल्या इन्स्टाग्रामवरुन आपले हे हॉट आणि हटके फोटोशूट शेअर केले. तिच्या ह्या हॉट फोटोशूटला तिचे चाहते खूपच पसंत करतायत. ह्या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. फिल्मफेअर मासिकासाठी तिने अलीकडेच एक छान फोटोशूट केले. त्यातील काही निवडक फोटो तिने आपल्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केले.

 

View this post on Instagram

 

🌺Filmfare

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

 

View this post on Instagram

 

🦋

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

जूनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणा-या फिल्मफेअर मासिकासाठी कैतरीना कैफ ने हॉट फोटोशूट केलय. या शूटमध्ये तिने ऑलिव्ह ग्रीन ओव्हरसाइज स्वेटर परिधान केला आहे. त्यातीलच एक निवडक फोटो तिने आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. तसेच त्या फोटोसोबत फिल्फेअरच्या कव्हर पेज असं कॅप्शन लिहलं आहे की, 'I am Still Single' (मी अजून सिंगल आहे). हे कॅप्शन पाहून तिच्या चाहत्यांमध्येही उत्सुकता वाढलीय. कदाचित ह्या मासिकामधून तिच्या रिलेशनशिप स्टेटस बद्दल खुलासा केला असेल, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

गेले अनेक दिवस कैतरीनाच नाव विकी कौशलसोबत जोडलं जात होते. त्यामुळे कदाचित या चर्चांना पुर्णविराम देणारे हे स्टेटमेंट असावं असं म्हटलं जातय. तिच्या या फोटोशूटमध्ये तिच्या दिलखेचक अदांची एक झलक आपल्याला पाहायला मिळेल. तिच्या या फोटोशूटमधल्या सगळ्याच लूकना पसंती मिळालीय. तिच्या कव्हर फोटोला तर 9 लाखांच्या वर लाइक्स मिळाले आहेत.

Chashni Song: ‘भारत’ सिनेमातील सलमान खान आणि कैटरीना कैफ यांचे रोमॅन्टिक गाणं ‘चाशनी’ रसिकांच्या भेटीला (Watch Video)

ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणा-या 'भारत' चित्रपटाच्या प्रमोशनध्ये सध्या कैतरीना बिझी आहे. ह्या सिनेमाकडून तिला ब-याच अपेक्षा आहेत. ह्यात तिचा 70 दशकातला लूक खूपच चर्चेत आहे. तसेच तिने ह्या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतलीय हे चित्रपटाच्या प्रोमोज वरुन दिसतय. मात्र आता कैतरीनाची फ्लॉप चित्रपटाची मालिका जागा एक सुपरहिट सिनेमा घेणार का आणि तिची गाडी परत रुळावर येणार का हे येत्या 5 जूनला कळेलच.