अभिनेता 'कार्तिक आर्यन'च्या नावाने लखनऊ पोस्ट ऑफिसने जारी केला पोस्टल स्टॅम्प
कार्तिक आर्यन (Photo Credits: IANS)

बॉलिवूड मध्ये ‘प्यार का पंचनामा’ (Pyaar Ka Punchnama) आणि ‘सोनू के टिटू की स्विटी’ (Sonu Ke Titu Sweety) यांसारखे तरुणाईला साजेसे फ्रेश सिनेमा केलेला अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) सध्या लखनऊ (Lucknow) मध्ये पती पत्नी और वो (Pati Patni Aur Woh) या सिनेमाच्या शूटिंग मध्ये व्यस्थ आहे. यावेळी लखनऊ पोस्ट ऑफिस तर्फे कार्तिकचा एक अनपेक्षित सत्कार करण्यात आला. अलीकडेच लखनऊ मुख्यालय क्षेत्रातील पोस्ट ऑफिसचे मुख्याधिकारी कृष्ण कुमार यादव यांनी कार्तिकचा कस्टमाईझ्ड पोस्टल स्टॅम्प (Postal Stamp) लाँच केला आहे. ('सारा अली खान' आणि 'कार्तिक आर्यन'चा Kissing व्हिडिओ सोशल मीडियात झाला लीक (Video)

यासंदर्भात यादव यांनी सांगितल्यानुसार, लखनऊ मध्ये कार्तिकचा मोठा चाहता वर्ग आहे, या सर्वांच्या वतीने कार्तिकसाठी काहीतरी खास करण्याचे पोस्टल ऑफिसने ठरवले होते आणि मग एखाद्या स्टॅम्प कलेक्शनचा भाग होण्याहुन  अधिक खास काय असेल म्हणून कार्तिकच्या फोटोचा एक स्टॅम्प बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. नुकतेच या स्टॅम्पचे कार्तिकच्या हस्ते अनावरण करण्यात आले. स्टॅम्प पाहून साहजिकच कार्तिक खूप खुश झाला होता. यापुढे हा स्टॅम्प देशातच नव्हे तर विदेशात सुद्धा कोणाला पत्र लिहायचे झाल्यास नागरिकांना वापरता येणार आहे.

पहा कार्तिकच्या पती पत्नी और वो सिनेमातील लूकची झलक

दरम्यान, कार्तिक आर्यन लुकाछुपी सिनेमानंतर बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांना मधील एक महत्वाचे नाव बनला आहे. याशिवाय सारा अली खान सोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांमुळे देखील तो सतत लाइमलाईट मध्ये असतो. सध्या त्याचा येऊ घातलेला सिनेमा पती पत्नी और वोचे चित्रीकरण सुरु आहे. हा सिनेमा 6 डिसेंबर 2019 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यामध्ये कार्तिक सोबतच अनन्या पांडे, भूमी पेडणेकर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा 1978 च्या पती पत्नी और वो सिनेमाचा रिमेक असणार आहे.