Kareena Kapoor Khan चा दुसरा मुलगा जेह प्रथमच मीडिया कॅमेऱ्यात कैद; पहा व्हिडिओ
Jeh Ali Khan (Image Credit: Yogen Shah)

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) चा लहान मुलगा जेह (Jeh) बद्दल सध्या चर्चा सुरु आहे. फेब्रवारी मध्ये जेहचा जन्म झाल्यानंतर करीनाने सोशल मीडिया, प्रसारमाध्यमे यांपासून जेहला दूर ठेवले होते. करीनाने शेअर केलेल्या एक-दोन फोटोजमध्ये जेहचा चेहरा दाखवला नव्हता. त्यामुळे त्याची झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले होते. परंतु, आता जेह मीडिया कॅमेऱ्यात सुटला नाही. सैफ (Saif) आणि करीना जेह ला घेऊन बाहेर जात असताना पॅपराजीने त्याची झलक टिपली. (Kareena Kapoor Khan आणि Saif Ali Khan च्या दुसर्‍या मुलाचं नाव Jeh नव्हे Jehangir; Pregnancy Bible मधून खुलासा)

या व्हिडिओत कारमध्ये बसलेल्या जेहची झलक पाहायला मिळते. या व्हिडिओमुळे करीना आणि सैफचा दुसरा मुलगा जेहला पाहण्याची चाहत्यांची प्रतिक्षा संपली असावी. दरम्यान, तैमुर अली खान प्रचंड लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर त्याचे फोटोज, व्हिडिओज अल्पावधीत व्हायरल होतात. (Pregnancy Bible: करीना कपूरचे 'प्रेग्नन्सी बायबल’ पुस्तक वादाच्या भोवऱ्यात; Beed मध्ये धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार दाखल)

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

दरम्यान, काही दिवसांपूर्वी करीनाने गर्भारपणावर आधारीत 'प्रेग्नेंसी बायबल' पुस्तक लॉन्च केले आहे. यात तिने गर्भारपणातील आपले अनुभव मांडले आहेत. या  पुस्तकाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून यात करीनाच्या दुसऱ्या मुलाचे नाव जहांगिर असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे त्याच्या नावावरुन वाद निर्माण झाले. यापूर्वी तैमुरच्या नावावरुनही चांगलाच वादंग उठला होता.