Kareena Kapoor Khan आणि Saif Ali Khan च्या दुसर्‍या मुलाचं नाव Jeh नव्हे Jehangir; Pregnancy Bible मधून खुलासा
करिना कपूर खान । Photo Credits: Instagram

अभिनेत्री करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि सैफ अली खानचा (Saif Ali Khan) लेक तैमुर हा जन्माच्या दिवसापासून सोशल मीडीयामध्ये चर्चेचा विषय होता. त्याच्या प्रत्येक अपडेट्स वर नेटकर्‍यांचं, पॅपराझींचं लक्ष असतं. त्यामुळे सैफिनाने त्यांच्या दुसर्‍या मुलाच्या सोशल मीडीयावरील अपडेट्स बाबत कमालीची दक्षता पाळली आहे. अद्याप सैफ आणि करिनाने त्यांच्या दुसर्‍या मुलाचं नाव किंवा फोटो जाहिररित्या दाखवलेला नाही. काही दिवसांपूर्वी रणधीर कपूर यांच्या हवाल्याने करिनाच्या दुसर्‍या मुलाचं नाव Jeh असल्याचं समोर आलं होतं पण सध्या मीडीया रिपोर्ट्सनुसार सैफ करिनाच्या दुसर्‍या मुलाचं नाव जहांगीर आहे. नक्की वाचा: Kareena Kapoor ने विकेंड चा फॅमिली फोटो शेअर करत पहिल्यांदाच पोस्ट केली तिच्या चिमुकल्या नवाबाची झलक; पहा फोटो.

मीडीया रिपोर्ट्स नुसार, करिनाने काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केलेल्या Pregnancy Bible या तिने लिहलेल्या गरोदरपणातील काळावर आधारित पुस्तकात तिने मुलाचा उल्लेख जहांगीर असा केला आहे. त्यामुळे सैफ आणि करिनाच्या दुसर्‍या मुलाचं नाव जहांगीर असल्याचं समोर येत आहे.

दरम्यान सैफ आणि करिनाने अद्याप त्यावर कोणताही खुलासा केलेला नाही. तैमुरच्या जन्मानंतर त्याच्या नावावरून सोशल मीडीयात बरीच चर्चा झाली होती. 'तैमुर' ने काही वर्षांपूर्वी हिंदुस्तानावर आक्रमण केले होते त्यामुळे सैफिना ट्रोल झाले होते. पण आता दुसर्‍या मुलाच्या नावाच्या वेळेस हा प्रकार टाळण्यासाठी त्यांनी गुप्तता पाळली आहे.

करिना सोशल मीडीयात तिच्या धाकट्या मुलासोबतचे फोटो शेअर करते पण जाणीवपूर्वक त्याचा चेहरा लपवलेला असतो. करिना कपूर आणि सैफच्या दुसर्‍या बाळाचा जन्म 21 फेब्रुवारी 2021 दिवशी झाला आहे.