करीना कपूर राजकारणात एण्ट्री करण्याबाबत काय म्हणाली माहिती आहे?
Kareena Kapoor (file photo)

Lok Sabha Elections 2019:  अभिनेत्री करीना कपूर-खान (Kareena Kapoor Khan) काँग्रेसच्या (Congress) तिकिटावर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशा बातम्या प्रसारमाध्यमांमधून आल्या होत्या. मात्र, स्वत: अभिनेत्री करीना कपूर हिने या वृत्ताचे खंडण करत सध्यातरी आपला तसा कोणताच विचार नसल्याचे म्हटले आहे. करीना कपूर भोपाळ (Bhopal Lok Sabha Constituency) येथून लोकसभा निवडणूक लढणार का? या प्रश्नाचे उत्तर प्रसारमाध्यमांनी थेट करीना कपूर हिच्याकडूनच जाणून घेतले. स्वत: करीना कपूर हिनेच प्रतिक्रिया दिल्याने तिच्या उमेदावीबाबतच्या सर्वच चर्चा निकाली निघाल्या आहेत.

अभिनेत्री करीना कपूर हिने म्हटले आह की, प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्त निराधार आहे. लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत किंवा तिकिट देण्याबात मला कोणीही संपर्क साधला नाही. चित्रपट हेच सध्या माझे ध्येय आहे. चित्रपटांना आणि त्यातील भूमिकांना प्राधान्य देणे हेच सध्या माझ्यासाठी सध्यस्थितीत महत्त्वाचे वाटते. करीना सध्या 38 वर्षांची आहे. तिने राजकारणात उतरण्याबाबत सध्यातरी आपला विचार नसल्याचे म्हटले आहे.

अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत विवाहबद्ध झाल्यावर करीना कपूर पतौडी कुटुंबाशी जोडली गेली. त्यामुळे करीना आता भोपाळची सूनबाई आहे. पती सैफ अली खान याच्यासोबतही करीना अनेकदा भोपाळला आली आहे. हाच धागा पकडत अनेक काँग्रेस आमदारांनी करीनाच्या नावाचा आग्रह धरला आहे. (हेही वाचा, लोकसभा निवडणूक 2019: भोपाळच्या सूनबाई करीना कपूर काँग्रेसच्या तिकीटावर भाजपला देणार धक्का?)

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, भोपाळचे आमदार गुड्डू चौहान, अमित शर्मा आणि मोनू सक्सेना यांनी पक्षाच्या वरिष्ठांना पत्र लिहून करीनाच्या उमेदवारीबाबत आग्रह धरला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजयाची मुसंडी मारत शिवराज सिंह चौहान यांच्या रुपात गेली 15 वर्षे सत्तेत असलेल्या सरकारला पराभूत केले होते. या विजयानंत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार उत्साह दिसत आहे.