Anayra 1st Birthday (Photo Credits: Instagram)

बेस्ट कॉमेडियन कपिल शर्माची मुलगी अनायरा (Kapil Sharma's Daughter Anayra) नुकतीच एक वर्षाची झाली. यानिमित्त कपिल शर्मा आणि त्याच्या कुटूंबियांना छान बर्थडे पार्टीचे (Anayra 1st Birthday) आयोजन केले होते. या बर्थडे बॅशला छान सजावट करण्यात आली होती. तसेच अनायराचे निखळ हास्य आणि गोंडस रुप सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. तिच्या वाढदिवसाचे फोटोज सोशल मिडियावर व्हायरल झाले (Viral Photos) असून अनेक जण तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे. तिचे क्युट फोटोज पाहून चाहते अक्षरश: घायाळ झाले आहेत. कपिल शर्माने इन्स्टाग्राम अकाउंट हे फोटोज शेअर केले असून या फोटोला 14 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत

या फोटोजमध्ये अनायराने गुलाबी रंगाचा छान ड्रेस घातला असून डोक्यावर हि-यांचा मुकुट घातल्याने ती एका गोष्टीतील क्युट परीसारखी दिसत आहे. यातील तिचे निरागस रुप सर्वांचा चर्चेचा विषय ठरला आहे.हेदेखील वाचा- कपिल शर्मा ने त्याच्या बेबी गर्ल 'अनायरा शर्मा' ची पहिली झलक शेअर केली सोशल मीडियावर (Photos Inside)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

या तिच्या वाढदिवसाचे आणखी एक आकर्षण म्हणजे कपिल, त्याची पत्नी आणि त्याची आई या तिघांनी एक मेसेज लिहिलेले टी शर्ट घातले आहे. ज्यावर 'Anayara Turns One' असे लिहिले आहे.

कपिल शर्मा ची मुलगी स्टारकिड्सपैकी एक आहे. तिचे अनेक फोटोज सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. कपिल शर्मा देखील आपल्या मुलीचे क्युट व्हिडिओज आणि फोटोज सोशल मिडियावर शेअर करत असतो.