Chetan Kumar Arrested: हिंदू धर्मावर वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी कन्नड अभिनेता चेतन कुमारला अटक
Chetan Kumar (PC - Instagram)

Chetan Kumar Arrested: कन्नड चित्रपट अभिनेता चेतन कुमार (Chetan Kumar) याला बेंगळुरू पोलिसांनी हिंदू धर्माविरोधात वादग्रस्त ट्विट केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. चेतन कुमार यांनी आपल्या ट्विटमध्ये हिंदू धर्माचे अस्तित्व खोटे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, 'हिंदुत्व हे खोट्या गोष्टींवर आधारित आहे.'

या अभिनेत्याच्या विरोधात शेषाद्रिपुरम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून त्याने धार्मिक भावना दुखावल्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला. चेतन कुमारने आपल्या ट्विटर अकाउंटवर हिंदू धर्माविरोधात ट्विट केले होते. अभिनेत्याचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याच्या या ट्विटनंतर बजरंग दलाच्या शिवकुमारने शेषाद्रिपुरम पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, ज्यामुळे आज सकाळी अभिनेता चेतन कुमारला अटक करण्यात आली. (हेही वाचा - Salman Khan Death Threat: सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी चाहत्यांना सलमानच्या वांद्रे अपार्टमेंटबाहेर जमण्यापासून रोखले)

आपल्या ट्विटमध्ये चेतनने हिंदुत्वाला खोटारडे म्हणण्याबरोबरच सावरकर, बाबरी मशीद तसेच उरी गौडा आणि नांजे गौडा यांची नावे घेतली. अशाच एका घटनेप्रकरणी अभिनेता चेतन कुमार आधीच जामिनावर बाहेर आहे. हिजाब प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित यांच्या विरोधात ट्विट केल्याबद्दल त्याला फेब्रुवारी 2022 मध्ये अटक करण्यात आली होती.

तथापी, 'कंतारा' चित्रपटाबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल ऑक्टोबर 2022 मध्ये चेतन कुमारच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता.