Kangana Ranaut ची कबुली- 'आपल्याकडे काम नाही, मागच्यावर्षी फक्त अर्धाच कर भरला, सरकार थकित करावर जोडत आहे व्याज'
Kangana Ranaut (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडमधील एक विवादित अभिनेत्री म्हणून कंगना रनौतकडे (Kangana Ranaut) पाहिले जाते. कंगना रनौत ही बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणूनही ओळखली जाते. मात्र कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनमुळे गेल्या दीड वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीतील काम ठप्प झाले आहे. कलाकारांपासून ते ज्युनिअर आर्टिस्ट, सेटवर काम करणार्‍या अनेकांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे. आता अभिनेत्री कंगना रनौतनेही दावा केला आहे की तिच्याकडेही काम नाही व म्हणून तीदेखील आर्थिक अडचणींचा सामना करत आहे.

एवढेच नव्हे तर कंगनाने म्हणाली आहे की, यामुळे गेल्या वर्षीच्या उत्पन्नाचा अर्धा करही ती भरू शकली नाही. कंगनाचा हा दावा अशा वेळी आला आहे, जेव्हा ती देशातील सर्वाधिक कर भरणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जात आहे.

कंगना रनौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये कर न भरल्याची व्यथा व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या 'इच वन पे वन पॉलिसी' वर व्हिडिओ क्लिप शेअर करत तिने लिहिले आहे की, 'मी सर्वाधिक कर स्लॅबमध्ये येते. माझ्या कमाईतील सुमारे 45 टक्के रक्कम मी कर म्हणून भरते. मी सर्वाधिक कर भरणारी अभिनेत्री असूनही, आता माझ्याकडे काम नसल्यामुळे मी माझा मागील वर्षाचा अर्धा कर भरला नाही. आयुष्यात प्रथमच मला कर भरण्यास उशीर होत आहे.'

कंगना पुढे म्हणते, ‘सरकार माझ्या थकित करावर व्याज जोडत आहे. मात्र मी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करते. सध्याचा काळ सर्वांसाठीच कठीण आहे मात्र आपण सर्वजण एकत्र अशा काळावर मात करुया.' (हेही वाचा: Vicky Kaushal आणि Katrina Kaif रिलेशनशिपमध्ये? Harshvardhan Kapoor ने केला महत्त्वपूर्ण खुलासा)

वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाले तर, कंगना रनौतचा 'थलायवी' अजूनही रिलीजच्या प्रतीक्षेत आहे. जयललिता यांचा हा बायोपिक यापूर्वी 23 एप्रिल 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, मात्र कोरोना संसर्गामुळे तो पुढे ढकलण्यात आला आहे. दुसरीकडे, कंगनाच्या झोळीत 'तेजस' आणि 'धाकड' आहे. याशिवाय ती मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिद्दा' आणि इंदिरा गांधींवर आधारित चित्रपटातही दिसणार आहे.