Lok Sabha Election 2024 Result: कंगना राणौत (Kangana Ranaut) तिच्या स्पष्टवक्ते स्वभावासाठी ओळखली जाते. तिच्या वेगळ्या चित्रपट कारकिर्दीव्यतिरिक्त, ती भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करत राजकारणात सक्रियपणे सहभागी झाली आहे. कंगना रणौत हिने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून (Mandi Constituency) भाजपाच्या (BJP) नेतृत्वाखाली विजय मिळवला आहे.
कंगना रणौतने 72,088 मतांनी खासदार म्हणून विजय मिळवला. काँग्रेसच्या लोकप्रिय नेत्यांपैकी एक असलेले रामपूर राजघराण्याचे वारस आणि हिमाचल प्रदेशचे सहा वेळा मुख्यमंत्री राहिलेले दिवंगत वीरभद्र सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य सिंग यांचा तिने पराभव केला आहे. (हेही वाचा -Kangana Ranaut Mandi Election Results 2024: 'कंगना रणौत 37 हजार मतांनी आघाडीवर, म्हणाली - 'जे लोक स्वस्तात बोलतात त्यांना परिणाम भोगावे लागतात' (Watch Video))
स्वत: कंगना रणौतने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून तिच्या विजयाचा आनंद तिच्या चाहत्यांशी शेअर केला आहे. सोशल मीडियावर लोक अभिनेत्रीचे तिच्या विजयाबद्दल अभिनंदन करत आहेत. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल राशिद खान यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. (हेही वाचा -Lok Sabha Election Results 2024: अभिनेत्री कंगना रणौतच्या विजयानंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट)
मंडी लोकसभा मतदारसंघातील विजयी भाजप उमेदवार कंगना राणौतने म्हटलं आहे की, 'आज, पंतप्रधान मोदींच्या हमी आणि विश्वासार्हतेवर आम्ही तिसऱ्यांदा सरकार बनवणार आहोत. त्यामुळे आता मंडीचं भविष्य देखील उज्ज्वल असेल.'
View this post on Instagram
दरम्यान, प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी (भाजप) तिसऱ्यांदा मथुरामधून लोकसभेसाठी उभ्या राहिल्या आणि ताज्या आकडेवारीनुसार, त्या काँग्रेसचे उमेदवार मुकेश धनगर यांच्यापेक्षा 2,38,340 लाख मतांच्या फरकाने पुढे आहेत. हेमा मालिनी यांना आतापर्यंत 397027 मते मिळाली आहेत.