Lok Sabha Election Results 2024: अभिनेत्री कंगना रणौतच्या विजयानंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट

Lok Sabha Election Results 2024: अभिनेत्री कंगना रणौतच्या विजयानंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
Anupam Kher

बॉलीवूडची धाकड गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंगना रणौत यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बाजी मारली आहे.  कंगना रणौत भाजपाच्या तिकीटावरून मंडी मतदारसंघाच्या रिंगणात उतरल्या होत्या. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांचा कंगना यांनी पराभव केला आहे.  याच निमित्ताने ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.  अनुपम यांनी लिहिलं आहे, “माझी प्रिय कंगना, बहुमताने विजयी झाल्याबद्दल तुझं अभिनंदन. तू रॉकस्टार आहेस. तुझा आतापर्यंतचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. हिमाचल प्रदेश आणि मंडीमधील लोकांसाठी आणि तुझ्यासाठी खूप आनंद झाला आहे. तू वेळोवेळी सिद्ध केलं आहे की, जर एखाद्याने लक्ष केंद्रीत करून कठोर परिश्रम केले तर काहीही होऊ शकत. जय हो.”

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2024 06:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).