Kangana Ranaut, Hrithik Roshan (Photo Credits: Instagram)

Kangana Ranaut Vs Hrithik Roshan: मुंबई पोलिसांनी अभिनेता ऋतिक रोशन याचे 2016/17 मध्ये सायबर सेलमध्ये केलेली एक तक्रारीचे प्रकरण क्राइम इंटेलिजेंस युनिट (Crime Intelligence Unite) यांना हस्तांतरित केले आहे. ऋतिक याच्या वकिलांनी पोलीस आयुक्त यांना हे प्रकरण ट्रान्सफर करावी अशी विनंती केली होती. त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभुमीवर कंगना हिने ऋतिकवर ट्विट करत निशाणा साधला आहे.(Kangana Ranaut ला कायदेशीर नोटीस; शेतकरी आंदोलनातील आजींबाबत फेक ट्वीट केल्याने वाढल्या अडचणी)

कंगना हिने केस ट्रान्सफर केल्याच्या बातमीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या ट्विटमध्ये तिने ऋतिक याला सुद्धा तिने टॅग केले असून एका लहानश्या अफेअरसाठी कधी पर्यंत रडणार असे म्हटले आहे. तसेच पुढे कंगना हिने असे ही म्हटले की, याची दु:खाची कहाणी पुन्हा एकदा सुरु झाली आहे. आमचे ब्रेकअप आणि त्याच्या घटस्फोटाला काही वर्षे झालीत. मात्र त्याने पुढे जाण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. कोणत्याही महिलेला डेट करण्याचे ही त्याने नाकारले आहे. ज्यावेळी मी माझ्या खासगी आयुष्यात आक्षेचा किरण पाहते त्याचवेळी तो तेच नाटक पुन्हा सुरु करतो. कधी पर्यंत रडणार आहे एका लहानश्या अफेरसाठी? असा प्रश्न ही कंगना हिने ट्विट मध्ये उपस्थितीत केला आहे.(मुंबई महापौरांच्या 'त्या' विधानावर कंगना रनौत हिचे प्रत्युत्तर; आदित्य पंचोली आणि ऋतिक रोशन च्या नावाचाही उल्लेख)

Tweet:

ऋतिकच्या प्रकरणाबद्दल अधिक माहिती देत मुंबई पोलिसांनी असे म्हटले की, त्याची केस आता क्राइम इंटेलिजेंस युनिटकडे सोपवण्यात आली आहे. त्याने सायबर सेलमध्ये 2017/17 च्या काळात इंटरनेटवर स्टॉक करण्यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत ऋतिक याने असे म्हटले की, 2013-14 मध्ये कंगना हिचा ईमेल आयडीवरुन शेकडो इमेल पाठवण्यात आले होते.