Kangana Ranaut Trolls Joe Biden: कंगना रनौत ने अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडेन यांना केले ट्रोल, म्हणाली 1 वर्ष सुद्धा टिकणार नाही
Kangana Ranaut And Joe Biden (Photo Credits:Facebook/Instagram)

Kangana Ranaut Trolls Joe Biden: कंगना रनौत (Kangana Ranaut) चे सोशल मिडियाच्या माध्यमातून बॉलिवूड, राजकारणी नेत्यांसह सर्वांवर टिकास्त्र सोडण्याचे काम चालूच आहे. मात्र आता तिने चक्क नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनलेले जो बायडेन (Joe Biden) यांच्यावर टिका केली आहे. जो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)  यांना पराभूत केले. त्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत असताना कंगनाने मात्र आपल्या अंदाजात त्यांच्यावर टिका केली आहे. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष एक वर्ष देखील टिकणार नाही असं ती म्हणाली आहे.

कंगनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "गजनी बायडेन यांचे माहित नाही ज्यांचा डाटा दर 5 मिनिटाला क्रॅश होतो. जी औषधे त्यांना देण्यात आली आहेत, ती 1 वर्षापेक्षा जास्त टिकणार नाहीत. हे पद कमला हैरिस चांगले सांभाळेल.' जेव्हा एक महिला उठते तेव्हा ती दुस-या महिलेसाठी ती रस्ता बनवते. या ऐतिहासिक दिवसासाठी चीअर्स'. या पोस्टमध्ये कमला हैरिसचे (Kamala Harris) कौतुक करत कंगनाने जो बायडेनवर निशाणा साधला आहे. हेदेखील वाचा- US Presidential Election 2020: डेमोक्रॅटीक पक्षाचे Joe Biden असणार अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष; 20 जानेवारी 2021 ला स्विकारणार पदभार

दरम्यान निवडणूकीच्या 1 आठवडा आधी जो बायडेने चुकून ट्रम्प यांना 'जॉर्ज' म्हणाला होता. व्हर्च्युअल संभाषणात ते डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव विसरले होते आणि त्यांचे नाव जॉर्ज असे उच्चारले होते. हाच मुद्दा घेऊन कंगनाने जो बायडेन यांच्यावर निशाणा साधला आहे.

कंगनाने आतापर्यंत अनेक दिग्गजांवर निशाणा साधला आहे. प्रसारमाध्यमांपासून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह अनेकांवर सोशल मिडियाच्या माध्यमातून टिका केली आहे.