Kangana Ranaut | (Photo Credits-Twitter Video)

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असते. अभिनयासह आपल्या बोल्ड आणि बिनधास्त वक्तव्यांसाठी ती चर्चेत असते. अलिकडेच कंगनाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात कंगनाने कोविड-19 रिकव्हरीचा (Covid-19 Recovery) अनुभव शेअर केला आहे. 4 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये कंगनाने आपला कोरोनामुक्तीचा प्रवास सांगितला आहे. (Kangana Ranaut Tests Negative for COVID-19: कंगना रनौत ची कोरोना चाचणी निगेटिव्ह; पहा काय म्हणाली)

कंगना या व्हिडिओत म्हणते की, "आज मी तुमच्यासोबत कोरोना व्हायरसचा माझा अनुभव शेअर करणार आहे. साधारण सर्दी खोकल्यासारखा असणारा हा आजार मात्र रिकव्हरी दरम्यान माझ्यासोबत वेगळ्याच गोष्टी झाल्या. कोणत्याही घटनेनंतर आपले शरीर रिकव्हर होते तेव्हा ते सातत्याने होत असते. परंतु, कोरोना फॉल्स रिकव्हरी देत असतो, ही त्याची सर्वात धक्कादायक बाब आहे. जसं की माझा रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर 2 दिवसांनंतर मी पूर्णपणे ठीक झाल्याचे मला वाटू लागले आणि कोणतेही काम सहज करु शकते असे वाटू लागले. परंतु, मी काही करण्यासाठी उभे राहण्याचा प्रयत्न करत असताना मला उठवत नव्हते. हा व्हायरस जेनेटिकली मॉडिफाईड आहे. आपल्या शरीरातील रिस्पांस याने म्युट केला आहे."

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

कोविड फॉल्स रिकव्हरी देत असल्याने अवयव निकामी होऊ लागतात आणि मृत्यू ओढावतो. "मित्रांनो, रिकव्हरी गरजेची आहे. मी अनेक डॉक्टरांशी या विषयावर बोलले आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की, विश्रांतीचा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे काळजी घ्या आणि या व्हायरसचा आपण सर्व मिळून सामना करुया. जय हिंद."