Kangana Ranaut Receives Death Threats (फोटो सौजन्य - Instagram, Facebook)

Kangana Ranaut Receives Death Threats: हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातील भाजप खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) ला पुन्हा जीवे मारण्याची धमकी (Death Threats) मिळाली आहे. अभिनेत्रीला ही धमकी तिच्या बहुप्रतिक्षित 'इमर्जन्सी' चित्रपटाबाबत (Emergency Movie) मिळाली आहे. एका व्हिडीओ संदेशात अभिनेत्रीला धमकी देण्यात आली आहे. या व्हिडिओ मेसेजमध्ये शिखांचा एक गट बसून अभिनेत्रीला चप्पल मारण्याची आणि शिरच्छेद करण्याची धमकी देताना दिसत आहे. कंगनाला धमकी देणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यावर अभिनेत्रीने आता प्रतिक्रिया दिली आहे.

शीख समुदायाच्या व्यक्तींनी दिली धमकी -

व्हायरल व्हिडिओमध्ये शीख समुदायाचे काही लोक दिसत आहे. व्हिडीओमध्ये हे लोक म्हणत आहेत की, 'तुम्ही हा पिक्चर रिलीज केला तुम्हाला चप्पने मार खावा लागेल. तुम्ही आधीच थप्पड खाल्ली आहे. माझा माझ्या देशावर विश्वास आहे. मी अभिमानी शीख असून मला मराठीचाही अभिमान आहे. मला माहीत आहे की फक्त शीखच नाही तर एक मराठी, ख्रिश्चन आणि अगदी हिंदूही तुम्हाला थप्पड मारतील. (हेही वाचा - BJP On Kangna Ranaut Comments: शेतकरी आंदोलनावर कंगना रणौतने केलेल्या वक्तव्याशी भाजप असहमत; पक्षाने दिलं स्पष्टीकरण)

पुढे व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, इतिहास बदलता येत नाही. त्यांनी चित्रपटात शीखांना दहशतवादी म्हणून दाखवले तर कोणाच्या चित्रपटात कोणते सीन घडले ते आठवा. सतवंत सिंग आणि बेअंत सिंग कोण होते ते आठवा. जे आमच्याकडे बोट करतात. त्यांना आमचा शिरच्छेद करायचा असेल तर आम्हीही शिरच्छेद करू शकतो. राहुल चौहान नावाच्या युजरने हा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्याने लिहिले- 'आपल्या देशात काय चालले आहे? भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला लोक खुलेआम धमक्या देत आहेत. जे या चित्रपटात फक्त इतिहासात घडलेल्या गोष्टी दाखवत आहे. आयर्न लेडीची कथा पडद्यावर आणणे चुकीचे आहे का?' (हेही वाचा -Kangana Ranaut in Bigg Boss Marathi: कंगना रनौत यांची ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री; सदस्यांशी साधला संवाद)

कंगनाच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटाला बऱ्याच दिवसांपासून विरोध होत आहे. शीख समुदायाने याला प्रोपगंडा चित्रपट म्हटले आहे. अगदी शीख परिषदेनेही ऐतिहासिक घटनांचे चुकीचे वर्णन केल्याचा आणि शहीदांचा अनादर केल्याचा आरोप केला आहे. शीख समाजाकडून या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे.

कंगनाने दिली प्रतिक्रिया -

कंगनाने हे ट्विट रिट्विट केले आहे. यासोबत तिने डीजीपी महाराष्ट्र, हिमाचल पोलिस आणि पंजाब पोलिसांना टॅग करून लिहिले, 'तुम्ही हे पहा.' कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीवर आधारित आहे. हा चित्रपट 6 सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगना मुख्य अभिनेत्री असून तिनेच या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे.