पूजा भट्ट आणि कंगना रनौत यांच्यात नेपोटिज्मवरुन ट्विटरवॉर; सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांच्या नात्यामध्ये महेश भट्ट यांना इतका रस का? कंगनाचा थेट सवाल
Kangana Ranaut and Pooja Bhatt (Photo Credits: Twitter)

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड मधील वातावरण पूर्णतः ढवळून निघाले आहे. तर सोशल मीडियावर विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत. सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड इंटस्ट्रीमधील नेपोटिज्मचा (Nepotism) मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पूजा भट्ट (Pooja Bhatt) हिच्या कुटुंबियांवर देखील नेपोटिझमचा आरोप करण्यात आला होता. मात्र "माझ्या कुटुंबाने नेहमीच योग्य कलाकारांना संधी दिली आहे," असे म्हणत तिने नेपोटिज्मचे आरोप फेटाळून लावले. त्यानंतर तिने काही ट्विटमध्ये कंगना रनौत हिचे Kangana Ranaut) नाव देखील घेतले होते. त्यात तिने लिहिले की, "महेश भट्ट (Mahesh Bhatt) आणि मुकेश भट्ट (Mukesh Bhatt) यांच्या प्रॉडक्शन कंपनी निर्मिती गँगस्टर सिनेमातूनच कंगना हिला मोठे यश मिळाले होते."

यावर कंगना हिने देखील चांगलेच उत्तर दिले आहे. टीम कंगना रनौत या ट्विटर हँडलवरुन केलेल्या ट्विटमध्ये लिहिले की, "पूजा भट्ट तुझ्या माहिती साठी सांगते, गँगस्टर सह कंगनाने पोकिरी या सिनेमासाठी देखील ऑडिशन दिले होते आणि त्यातही माझी निवड झाली होती. पोकिरी हा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला होता. तर तुम्हाला वाटत असेल की कंगना जे काही आहे ते सर्व गँगस्टरमुळे तर ते खरे नाही. पाणी स्वतःच आपला मार्ग शोधतो." (सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी चौकशी करता जाण्यास कंगना रनौत ने दिला नकार?)

Team Kangana Ranaut Tweet:

पुढच्या ट्विटमध्ये कंगना लिहिते, "तुम्ही तिला पागल बोला. तिचा अपमान करा. महेश भट्ट यांनी कंगनाच्या tragic end ची घोषणा केली होती. आणखी एक महेश भट्ट यांना सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांच्या नात्यात इतका रस का आहे? त्यांनी त्याच्याही end ची घोषणा का केली? हे काही प्रश्न आहेत. जे तुम्हाला त्यांना विचारायला हवेत."

पुढे कंगना असे म्हणते, "प्रिय पूजा भट्ट, महेश भट्ट यांना कंगनाच्या प्रतिभेची कल्पना आहे. आणि महेश भट्ट कलाकारांना पैसे देऊ इच्छित नाहीत, हे देखील सर्वांना ठाऊक आहे. तसंच प्रतिभावान कलाकारांकडून ते फ्री मध्ये काम करु इच्छितात. तुम्ही लोकांना काम देऊन त्यांच्यावर फेव्हर करत आहात म्हणून त्यांच्याबद्दल काहीही बोलण्याचे लायसन्स तुझ्या वडीलांना मिळालेले नाही."