Junglee Trailer: 'विद्युत जामवाल'च्या 'जंगली' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर, पूजा सावंत, अतुल कुलकर्णी लक्षवेधी भूमिकेत
Junglee Official Trailer (Photo Credits: You Tube)

Junglee Trailer: विद्युत जामवालच्या (Vidyut Jammwal) अ‍ॅक्शनपॅक्ट 'जंगली' सिनेमाचा ट्रेलर अखेर रीलीज करण्यात आला आहे. या सिनेमामध्ये अतुल कुलकर्णी (Atul Kulkerni), मकरंद देशपांडे (Makrand Deshpande), पूजा सावंत (Pooja Sawant) अशी मराठमोळी कलाकार मंडळीही असल्याने या सिनेमाबाबत त्यांच्या रसिकांमध्ये विशेष उत्सुकता आहे. मनुष्य आणि हत्ती यांच्यामधील जिव्हाळ्याच्या नात्याचं दर्शन या सिनेमामधून रसिकांसमोर येणार आहे. या सिनेमामध्ये 'राज' हे मुख्य पात्र अभिनेता विद्युत जामवाल याने साकारले आहे.

'राज' लहानपणापासून एलिफेंट रिजर्वमध्ये राहतो. वडिलांनी उभारलेल्या या एजिफंट रिझर्व्हमध्ये त्याची हत्तींसोबत एक विशेष ओढ निर्माण होते. 'भोला' या एका बेबी एलिफंटसोबत त्याचा जिव्हाळा असतो. कालांतराने राज जानवरांचा डॉक्टर होतो. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राज पुन्हा एलिफंट रिझर्व्हमध्ये परततो मात्र तोपर्यत काही शिकारी हस्तिदंताची शिकार करून मालामाल होण्याचा विचार करत असतात. शिकार्‍यांसोबत राज कसा सामना करतो? त्याला हस्ती रिझर्व्ह वाचवण्यात यश येतं का? हे पाहणं उस्तुकतेचे आहे.

अमेरिकन सिनेमा दिग्दर्शक चक रसेल (Chuck Russell) यांनी 'जंगली' सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर 'जंगली' पिश्चर्सने त्याची निर्मिती केली आहे. हा सिनेमा 5 एप्रिल 2019 रोजी रीलिज होणार आहे.