Tharla Tar Mag: ठरलं तर मग (Tharla tar Mag) या मालिकेतील एका कलाकारचं अपघाती निधन झाल्याने संपूर्ण मराठी चित्रपटसुष्टीवर शोककळा पसरली आहे. मालिकेतील गौरव काशिदे याचं वयाच्य अवघ्या 24 व्या वर्षी निधन झालंय. त्याच्या निधनाच्या बातमीमुळे ठरलं तर मग मालिकेच्या सेटवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या निधनानंतर अभिनेत्री जुई गडकरी हिने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली आहे.
आपल्या पोस्टमध्ये जुई गडकरीने लिहले आहे की, “ताई मला कोणी ऊठवलंच नाही, म्हणुन लेट झाला यायला!” हे त्याचं पहिलं वाक्य होतं आमचं युनिट जॅाईन केल्यावर! पहिल्याच दिवशी लेट आला होता तो! मग रुळत गेला हळुहळु..सिन चे que देताना जर ते character पळत आलेलें आसेल तर तो पळुन पण दाखवायचा.. हुषार होता… मला रोजचे सिन explain करायचा.. हसतमुख होता… मेहनती होता.. त्या वयात मुलं असतात तसा अल्हड पण होता… मला थोडा घाबरायचा म्हणुन “ताईसमोर स्मोक करुन गेलं कि ताई लगेच ओळखते आणि ओरडते…त्यापेक्षा नाही करत स्मोक” असं म्हणुन निदान तेवढ्यापुरतं तरी टाळायचा… गुणी मुलगा होता..
पाहा पोस्ट -
पुढे तिने म्हटलं की, "रात्री घरी जाताना आमच्या दुसर्या एका female AD ला आणि hair dresser ला घरी सोडुन जायचा… त्या ही रात्री तो त्या दोघिंना चारकोप ला सोडुन पुढे गेला… त्या दिवशी नेमकी आमची hairdresser चारकोपलाच ऊतरली… नाहीतर ती रोज त्याच्याबरोबर माहिम पर्यंत जायची… आणि तो तिला न्यायचं म्हणुन गाडी सांभाळुन चालवायचा…त्याचा २४ वा वाढदिवस होता १०जुन ला… ९तारखेला त्याच्या बाईकचा बॅंड्रा मध्ये भिषण अपघात झाला…"