देशातील कोरोना व्हायरसचे संकट अधिकाधिक तीव्र होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सातत्याने वाढणारी कोरोना बाधितांची संख्या, मृतांचा आकडा यामुळे भीती वाढते. तर दिवसरात्र होत असणारा कोरोनाच्या बातम्यांचा भडिमार यामुळे नकारात्मक वातावरण तयार होते. मनातून कितीही स्वस्थ, सकारात्मक आणि शांत राहण्याचा प्रयत्न केला तरी थोड्याच वेळात विचारांचे, चिंतेचे मळभ मनात दाटते. अशा तणावपूर्ण परिस्थितीत कॉमेडी अभिनेता जॉनी लीवर (Johnny Lever) याने कोरोनावर एक मजेशील गाणे तयार केले आहे. हे गाणे वातावरण हलकं फुलकं करण्यात नक्कीच मदत करेल.
'कोरोना अब तेरा रोना शुरू हो जाएगा.. भागेगा तू करोना.. मांगेगा ना पानी.. इंडिया मे जो घुसनेकी तू कर बैठा नादानी...' असे या गाण्याचे बोल असून हे गाणे तुम्हाला नक्कीच हसायला भाग पाडेल. आम्ही भारतीय आम्ही घरी राहूनच कोरोना तुझ्यावर मात करु, असा या गाण्याचा आशय आहे. (जॉनी लीवर ने आपल्या विनोदी अंदाजात नागरिकांना दिला घरी राहण्याचा सल्ला, पोट धरून हसायला लावणार व्हिडिओ नक्की पाहा)
पहा व्हिडिओ:
जॉनी लीवर हे नावच आपल्याला हसायला भाग पाडतं. त्यात गाण्याचे बोल, जॉनीचा कॉमेडी अंदाज यामुळे हे गाणे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. यापूर्वी कोरोना व्हायरस संकटावर मात करण्यासाठी घरी रहा असा सल्ला जॉनी लीवरने आपल्या विनोदी शैलीत दिला होता.
यापूर्वी अनेक सेलिब्रेटींनी कोरोना व्हायरसच्या संकटात पुढे येत मदत केली आहे. आर्थिक मदतीसोबतच नागरिकांना जागरुक करण्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मिडियाद्वारे संदेश दिला आहे.