जान्हवी कपूर चा चित्रपट 'गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल' चा ट्रेलर 1 ऑगस्टला होणार प्रदर्शित
Gunjan Saxena: The Kargil Girl (Image Credit: Twitter)

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Jhanvi Kapoor)  हिचा आगामी चित्रपट 'गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल' (Gunjan Saxena – The Kargil Girl) सध्या बराच चर्चेत आहे. हिच्या चित्रपटाबद्दल एक महत्वाची बातमी समोर येत आहे. उद्या म्हणजेच 1 ऑगस्टला या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. जान्हवी कपूर हिने भारतीय वायुसेना दलाची (Indian Air Force)  वैमानिक गुंजन ची यात भूमिका साकारली आहे. गुंजन ही तिचा पायलट आहे जिने 1999 मध्ये कारगिल युद्धामध्ये (Kargil War)महत्त्वाची भूमिका साकारली होती. याआधी या चित्रपटचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. याचे पोस्टर मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात चित्रपटाचा पोस्टर समोर आला होता. त्यावेळी हा चित्रपट 13 मार्च 2020 मध्ये प्रदर्शित होणार असे सांगितले होते.

मात्र कोरोनामुळे हा चित्रपट आता OTT प्लेटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबाबत माहिती दिली आहे. अभिनेत्री जान्हवी कपूर च्या 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' सह 'हे' मोठे चित्रपट देखील नेटफ्लिक्स वर होणार प्रदर्शित; येथे पाहा पूर्ण यादी

धर्मा प्रोडक्शन ने ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. 'गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल' चा ट्रेलर उद्या सकाळी 10 वाजता प्रदर्शित केला जाईल.

तर 12 ऑगस्टला हा नेटफ्लिक्स हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 'गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल' चे दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केले आहे. झी स्टुडिओज आणि धर्मा प्रोडक्शन च्या बॅनरखाली हा चित्रपट बनविण्यात आला आहे. जान्हवी कपूरसह पंकज त्रिपाठी आणि विनीत कुमार सुद्धा या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.