अभिनेता सुशांंत सिंंह राजपुत मृत्यु प्रकरण (Sushant Singh Rajput) , नेपोटिझम (Nepotism) , ड्रग्ज वरुन सुरु असणारे आरोप प्रत्यारोप या सगळ्यात काही विशिष्ट मंडळी फिल्म इंडस्ट्रीला जाणुन बुजुन अपमानित करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे योग्य त्या उपाययोजना करुन हा प्रकार थांंबवावा अशा आशयाचं भाषण काल राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांंनी काल संसदेत केलं होतं, त्यानंंतर आज जया आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांंच्या बंंगल्या बाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.प्राप्त माहितीनुसार जलसा (Jalsa) या बच्चन निवासस्थानाबरोबर मुंंबई पोलिसांंची (Mumbai Police) टीम तैनात करण्यात आली आहे,जया बच्चन यांंच्या विधानावरुन सुरु झालेल्या वादात खबरदारी बाळगण्यासाठी ही सुरक्षा वाढवण्यात आल्याचे पोलिसांंनी सांंगितले आहे.
काल, भाजप खासदार रवी किशन यांंनी बॉलिवूड मध्ये ड्रग्ज घेण्याबाबत केलेल्या कमेंटवरुन जया बच्चन यांंनी संंतप्त प्रतिक्रिया दिली होती, काही जणांंमुळे तुम्ही संपुर्ण इंडस्ट्रीला नावंं ठेवु शकत नाही निदान ज्या थाळीत खाताय तिथे तरी छेद करु नका असेही जया म्हणाल्या होत्या. या विधानावर जया यांंना भाजप खासदार हेमा मालिनी यांंच्यासहित बॉलिवूडकरांंनी पाठिंंबा दर्शवला होता मात्र दुसरीकडे रामदस आठवले यांंच्या सह अनेक नेत्यांंनी या विधानाला विरोध केला होता. याच पार्श्वभुमीवर काल सोशल मीडियावर #ShameOnJayaBachchan असा हॅशटॅग सुद्धा ट्रेंड होत होता.
PTI ट्विट
Security increased outside bungalows of Amitabh Bachchan and Jaya Bachchan in Mumbai, a day after she told Parliament that the film industry was being defamed by some and asked the government to protect and support it
— Press Trust of India (@PTI_News) September 16, 2020
दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांंकडुन जया बच्चन यांंच्या सुरक्षेत वाढ करणे हे भाजप च्या केंद्र सरकारने कंंगना रनौत ला दिलेल्या वाय प्लस सुरक्षेचंं उत्तर असल्याचं सुद्धा म्हंंलं जातंंय.