Shah Rukh Khan: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) वारंवार ट्विटरवर आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. मात्र, अनेकदा काही फॅन्स शाहरुखला अस्वस्थ करणारे प्रश्नदेखील विचारतात. परंतु, अशा परिस्थितीतदेखील किंग खान यूजर्सला आपल्या वक्तृत्वाने गप्प बसवतो. याचा नुकताचं एक अनुभव शाहरुखच्या चाहत्याला आला आहे. शाहरुखने मंगळवारी ट्विटरवर #AskSRK सत्राचे आयोजन केले होते. ज्यात एका वापरकर्त्याने त्याला मन्नतच्या विक्रीबद्दल विचारले. शारुखने या प्रश्नाला मजेदार उत्तर दिलं. वसीम नावाच्या वापरकर्त्याने शाहरुखला विचारले की, 'भाई, तुला मन्नत विकायची आहे का?' यावर शाहरुखने लिहिलं आहे, 'भाऊ मन्नत विकली जात नाही, ती नतमस्तक होऊन मागितली जाते. जर हे लक्षात ठेवलं तर, तुम्ही आपल्या जीवनात काहीतरी मिळवू शकालं.
दरम्यान, ट्विटर यूजर्सने शाहरुखला त्याचा बंगला 'मन्नत'च्या विक्रीबद्दल विचारले होते. शाहरुख खानच्या बंगल्याचा समावेश मुंबईच्या प्रतिष्ठित इमारतींमध्ये करण्यात येता. या सत्रात शाहरुखने खुलासा केला की, तो पुढच्या वर्षीचं पडद्यावर येऊ शकेल आणि लवकरचं शूटिंग सुरू करेन. त्यानंतर प्रॉडक्शन पोस्ट करेल आणि नंतर थिएटर पहिल्यासारखे होण्याची वाट पाहिलं. यास जवळपास एक वर्ष लागेल, असंही शारुखने यावेळी नमुद केलं. (हेही वाचा - Neha Kakkar-Rohanpreet Singh Wedding: लग्नानंतर नेहा कक्कड़ पती रोहनप्रीत सिंहसोबत मुंबईला पोहोचली; विमानतळावरील फोटो व्हायरल; Watch Photo)
Bhai Mannat bikti nahi sar jhuka kar maangi jaati hai....yaad rakhoge toh life mein kuch paa sakogay. https://t.co/dh3gJTVnOu
— Shah Rukh Khan (@iamsrk) October 27, 2020
काही दिवसांपूर्वी शाहरुख खान सिद्धार्थ आनंदच्या ‘पठाण’ चित्रपटात पडद्यावर परतणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मिड-डेच्या अहवालानुसार शाहरुख नोव्हेंबरच्या शेवटीपासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. यासाठी अंधेरी येथील यशराज फिल्म्स स्टुडिओची शूटसाठी निवड झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, या चित्रपटाचे पहिले वेळापत्रक दोन महिन्यांचे असेल. यात शाहरुख खान एकटाचं शूटिंग करणार आहे. यानंतर, टीम नवीन वर्षाचा ब्रेक घेईल. तसेच या चित्रपटाच्या शूटिंगसाठीचे दुसरे वेळापत्रक जानेवारीत सुरू होईल.
Will start shoot, then post production then cinemas to normalise...will take about a year I reckon.... https://t.co/3sn6OGal35
— Shah Rukh Khan (@iamsrk) October 27, 2020
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमदेखील या काळात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करतील. रिपोर्ट्सनुसार, जॉन या चित्रपटात नकारात्मक पात्राची भूमिका करताना दिसणार आहे. शाहरुखचा शेवटचा चित्रपट झिरो 2018 मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर शाहरुखने मोठा ब्रेक घेतला होता. शाहरुख आता चित्रपटांसाठी बरीच खबरदारी घेत आहे.