International Yoga Day 2021: शिल्पा शेट्टी, मलायका अरोरा सह 'या' बॉलिवूड अभिनेत्रींचा प्रेरणादायी योगाभ्यास; पहा Photos आणि Videos
Shilpa Shetty & Malaika Arora (Photo Credits: Instagram)

Yoga Day 2021: आज 21 जून, जागतिक योग दिन. भारताचे प्राचीन शास्त्र असलेल्या योगाने जगाला फिटनेसचा नवा मंत्रा दिला. योगाची महती आता सर्वांना पटली आहे. त्यामुळेच शरीराबरोबरच मनाचं स्वास्थ्य जपणारा योग सेलिब्रिटींपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांच्याच जीवनाचा एक भाग होत आहे. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री फिटनेससाठी योगाभ्यास करताना दिसतात. शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty), ईशा गुप्ता (Esha Gupta), माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), मलायका अरोरा (Malaika Arora), जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) या बॉलिवूड अभिनेत्रींचा योगाभ्यास प्रेरणादायी आहे. आज जागतिक योग दिनानिमित्त पाहुया त्यांचे खास फोटोज आणि व्हिडिओज... (केंद्रीय आरोग्यमंत्री Dr Harsh Vardhan,राष्ट्रपती Ramnath Kovind ते Nitin Gadkari यांनी आज योगाभ्यास करत दिल्या नागरिकांना योग दिनाच्या शुभेच्छा!)

शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty):

मलायका अरोरा (Malaika Arora):

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

माधुरी दीक्षित (Madhuri Dixit):

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

ईशा गुप्ता (Esha Gupta):

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Guupta (@egupta)

जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez):

या अभिनेत्रींच्या सुंदर आणि फिट दिसण्यासामध्ये योगसाधनेचा मोठा वाटा आहे. तसंच अभिनेत्रींचे हे फोटोज, व्हिडिओज नक्कीच योगाचं महत्त्व अधोरेखित करतात. दरम्यान, आजचा योग दिन संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. दरवर्षी सामुहिक योगसाधना करुन योग दिन साजरा होतो. मात्र यंदा कोविड-19 संकटामुळे व्हर्च्युअली तुम्ही एकत्रित साधना करु शकता.