IND vs PAK, CWC 2019  सामन्यादरम्यान सुनील गावस्कर आणि रणवीर सिंह यांचा 'बदन पे सितारे' गाण्यावर धमाल डान्स (Watch Video)
Ranveer Singh & Sunil Gavaskar (Photo Credits: Youtube)

आईसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2019 (ICC Cricket World Cup 2019) मधील भारतीय संघाचा तिसरा सामना काल पाकिस्तान विरुद्ध रंगला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 89 धावांनी विजय मिळवला. भारत पाक सामन्याची सर्व चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. सामन्यातील टीम इंडियाचा विजय क्रिकेटप्रेमींनी दणक्यात साजरा केला. या विजयाच्या आनंदात बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंह (Ranveer Singh) देखील सहभागी झाला. सुनील गावस्कर यांच्यासोबत रणवीर 'बदन पे सितारे' या गाण्यावर थिरकताना दिसला. त्यांचा हा धमाल डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ क्रिकेटर हरभजन सिंहने शूट केला असून तो युट्युबवर अपलोड करण्यात आला आहे. (भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यानंतर तैमुर नेही केलं सेलिब्रेशन; फोटो व्हायरल)

पहा व्हिडिओ:

रणवीर सिंह '83' या क्रिकेट संबंधित सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात रणवीर सिंह कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खान करत असून 1983 साली भारताने जिंकलेल्या वर्ल्डकपच्या यशोगाथेवर हा सिनेमा आधारित आहे.