माझ्यासारखे आयुष्य माझ्या मुलांच्या वाट्याला नको- कंगना रानौत
कंगना रानौत Photo Credits: Instagram)

बॉलिवूड क्विन कंगना रानौत लवकरच मणिकर्णिका सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमाबद्दल बोलताना कंगनाने सांगितले की, "राणी लक्ष्मीबाईंनी जीवनात अनेक अडचणींनी सामना केला आहे. असे आयुष्य कोणाच्या वाट्याला यावे, असे कोणालाच वाटत नाही. विशेषतः ज्या व्यक्तींवर आपले प्रेम असते."

पुढे कंगना म्हणाली की, "मला नाही वाटत की, माझ्या मुलांना माझ्यासारखे आयुष्य मिळावे. मी आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे आणि हेच माझ्या आणि लक्ष्मीबाईंमधील साम्य आहे."

"मला संघर्षाशिवाय काहीच मिळालेले नाही. मला या गोष्टीची लाजही वाटत नाही आणि गर्वही नाही. मी माझ्या आयुष्यात संतुष्ट आहे. पण माझ्या मुलांना माझ्यासारखे आयुष्य मिळू नये," ही माझी इच्छा आहे, असे कंगनाने सांगितले.

मणिकर्णिका सिनेमातील कंगनाचा लूक समोर आला असून तो अत्यंत दमदार आहे. त्याचबरोबर या सिनेमाचा टिझर गांधी जयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमात कंगना रानौत शिवाय टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे, सुरेश ओबेरॉय आणि अतुल कुलकर्णी हे कलाकार आहेत. अंकिता लोखंडे या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन क्रिश याने केले असून 25 जानेवारी 2019 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल. Manikarnika Teaser : मणिकर्णिकेच्या रूपात कंगणा राणावतचा डोळे दिपवणार अंदाज