Manikarnika Teaser : मणिकर्णिकेच्या रूपात कंगणा राणावतचा डोळे दिपवणार अंदाज
कंगना रनौत (Photo Credits: Youtube)

कंगना राणावतचा बहूप्रतिक्षित सिनेमा ' माणिकर्णिकाचा टीझर लॉन्च करण्यात आला आहे. झांसीच्या राणी च्या आयुष्यावर तिच्या हा सिनेमा पुढील वर्षी रसिकांच्या भेटीला येणार आहे. ब्रिटिशां विरुद्ध लढणाऱ्या मराठा मोळ्या शूरयोध्येचा यामधून रणांगणावरील पराक्रम पहिल्यांदा रुपेरी पडद्या वर पाहता येणार आहे. टीझर मधून कंगणाने साकारलेल्या झुंझार योध्येचं रूप पाहायला मिळाले आहे. या सिनेमात कंगणाने तलवार बाजी, घोडेस्वारीचं प्रशिक्षण घेतलं आहे.

कंगणा सोबत या सिनेमात अंकिता लोखंडे, वैभव तत्त्ववादी, अतुल कुलकर्णी, सुरेश ओबेरॉय हे कलाकारही दिसणार आहेत. अंकिता लोखंडे या सिनेमातून बॉलिवूड मध्ये पदार्पण करणार आहे. मणिकर्णिका हा सिनेमा २५ जानेवारी २०१९ ला रिलीज होणार आहे.

पद्मावत, बाजी राव -मस्तानी नंतर मणिकर्णिका हा आगामी ऐतिहासिक सिनेमा साऱ्यांचे लक्ष वेधून घेणार आहे. या चित्रपटाचा रॉयल लूक, माणिकर्णिकेच्या भूमिकेतील कंगना राणावतचा बिनधास्त अंदाज पाहण्यासारखा आहे. नेहमीच हटके भूमिकांमधून रसिकांच्या भेटीला येणाऱ्या कंगणा राणावतला पहिल्यांदाच चाहते ऐतिहासिक भूमिकेत पाहणार आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्येही कमालीची उत्सुकता आहे. मणिकर्णिका आणि ह्रतिक रोशनचा सुपर ३० हा सिनेमा बॉक्सऑफिस वर आमने सामने येणार आहे.