Kangana Ranaut Meets Governor: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वत:च्या मुलीसारखे माझे म्हणणे ऐकले; कंगना रनौत ची भेटीनंतरची प्रतिक्रिया
Kangana Meets Governor (Photo Credits: Twitter/ANI)

कंगना रनौत (Kangana Ranaut) विरुद्ध शिवसेना (Shivsena) या वादाने गेल्या काही दिवसात चांगलाच पेट घेतला. दुसरीकडे कंगनाचे मुंबईतील पाली हिल येथील कार्यालय मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत ठरवून तोडल्याने हा वाद आणखीनच चिघळला. त्यामुळे कंगनाने आज राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली. त्यावेळी कंगनासह तिची बहिण रंगोली चंडेलसुद्धा (Rangoli Chandel) होती. कंगनाने त्यांची भेट घेऊन त्यांना घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती दिली आणि राज्यपालांनी तिचे म्हणणे स्वत:च्या मुलीप्रमाणे ऐकून घेतल्याबद्दल तिने राज्यपालांचे आभार मानले.

गेल्या काही दिवसांपासून कंगनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी कंगनाने आज राज्यपालांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया कंगनाने ANI शी बोलताना दिली. Kangana Ranaut: शिवसेना सोबत भिडल्यानंतर आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची कंगना रनौत घेणार भेट

तसेच मला जर न्याय मिळाल तर तमाम तरुण मुलींसह महिलांचा नागरिकांचा व्यवस्थेवर विश्वास कायम राहिल असेही तिने सांगितले.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, 14 सप्टेंबरला कंगना हिला शहराच्या बाहेर जायचे आहे. कंगना हिच्या टीमने आयएनएस यांना असे म्हटले आहे की, सुरक्षा प्रोटोकॉलच्या कारणास्तव ती कुठे प्रवास करणार आहे याबद्दल आम्ही खुलासा करु शकत नाही. कंगना आणि राज्य सरकारमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर तिने एक अपमानकारक टिप्पणी सुद्धा केली होती. कंगना हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीर सोबत करत पोलिसांना खोटे असल्याचे म्हटले होते