Husnn Hai Suhaana 'Coolie No.1' Song: वरुण धवन (Varun Dhawan) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) यांचा सिनेमा कूली नंबर 1 (Coolie No. 1) सिनेमातील नवे गाणे आज रिलीज करण्यात आले आहे. 'हुस्न है सुहाना' (Husnn Hai Suhaana) हे जुने गाणे रिक्रीएट करण्यात आले असून सध्या सोशल मीडियावर ते हिट ठरत आहे. या गाण्यात वरुण आणि सारा ची रोमांटीक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. साराने या गाण्याची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. पोस्टमध्ये साराने लिहिले की, "मला काहीतरी अनाऊंस करायचे आहे. तर मस्ती, डान्स आणि बाऊन्ससाठी तयार व्हा. कारण प्रत्येक क्षणी मी उत्साहित आहे. पहा आमचे गाणे. वेळेवर या आणि एन्जॉय करा. हुस्न है सुहाना आता रिलीज झाले आहे." (Coolie No.1 Poster: वरुण धवन-सारा अली खान च्या हटके लूकसह 'कूली नंबर 1' चा फर्स्ट लूक प्रदर्शित)
या गाण्यात सारा-वरुणचा रोमांटीक, हॉट आणि मजेशीर अंदाजे पाहायला मिळत आहे. सारा अली खान या गाण्यात गोल्डन, सिव्हर, पिंक ड्रेसमध्ये अगदी सुंदर आणि हॉट दिसत आहे. सारा-वरुणचा डान्स देखील अगदी हटके आहे. त्यामुळे रिक्रीएट केलेले हे गाणे रसिकांच्या पसंतीस उतरेल, यात शंका नाही.
सारा अली खान पोस्ट:
View this post on Instagram
पहा गाण्याचा व्हिडिओ:
कुली नंबर 1 सिनेमातीलच हे गाणे असून जुने गाणे गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्यावर चित्रीत करण्यात आले होते. आता 2020 मध्ये पुन्हा प्रदर्शित होणाऱ्या कुली नं. 1 मध्ये 'हुस्न है सुहाना' हे गाणे नव्याने सामिल करण्यात आले आहे. दरम्यान, या सिनेमात सारा-वरुण यांच्या शिवाय परेश रावल, जावेद जाफरी, जॉनी लीवर, राजपाल यादव आणि मनोज जोशी यांसारखे कलाकारही आहेत. 25 डिसेंबर 2020 रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ वर हा सिनेमा प्रदर्शित होईल.