'Soulmate' म्हणत Sussanne Khan ची वाढदिवसानिमित्त Hrithik Roshan साठी खास पोस्ट (Photos)
Hrithik Roshan & Sussanne Khan (Photo Credits: Instagram)

Hrithik Roshan Birthday: बॉलिवूडचा हँडसम हिरो हृतिक रोशन (Hrithik Roshan) आज त्याचा 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. जगभरात लाखो फॅन्स असलेल्या हृतिकवर शुभेच्छांचा वर्षाव करत होत असतानाच एका खास पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हृतिकची एक्स वाईफ सुजैन खानने (Sussanne Khan) देखील रोमांटिक पोस्ट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हृतिक आणि मुलांसोबतचे फोटो शेअर करत तिने ऋतिकसाठी खास संदेश लिहिला आहे.

सुजैनने इंस्टावर पोस्ट करत लिहिले की, "माझ्या सर्वात जवळच्या मित्राला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ही शक्ती कायम तुझ्यासोबत राहो." त्याचबरोबर तिने हृतिक जगातील सर्वात चांगला पिता असून सोलमेट (Soulmate) असल्याचे तिने म्हटले आहे.

14 वर्षांच्या सुखी संसारानंतर 2014 मध्ये हृतिक आणि सुजैनन विभक्त झाले. हे दोघे वेगळे झाले असले तरी त्यांच्यातील मैत्री अद्यापही कायम आहे. त्यांच्यातील खास मैत्रीचे दर्शन अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून घडते.