Gadar 2 Poster (PC- Twitter)

Gadar 2: 'गदर 2' सध्या बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करत आहे. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत 'ओह माय गॉड' 2 ते 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि 'जेलर' पर्यंतच्या मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. 22 वर्षांनंतरही तारा सिंह आणि सकिना या जोडीची तीच मोहिनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत सुमारे 400 कोटींची कमाई केली आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर 'गदर 2' या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा (Anil Sharma) यांनी केले असून हा चित्रपट किती कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आल्या याचा खुलासा त्यांनी केला आहे.

दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी न्यूज18 शी केलेल्या खास संवादात चित्रपटाला मिळणाऱ्या प्रेमाबद्दल आनंद व्यक्त केला. एवढेच नाही तर त्यांनी चित्रपटाच्या बजेटबद्दलही सांगितले. अनिल शर्मा म्हणाले की, लोकांना वाटले होते की अनिल शर्मा पुन्हा चित्रपट करणार नाही. सनी देओलचे चित्रपट चालणार नाहीत. लोकांना वाटले की मी माझ्या मुलासाठी हा चित्रपट बनवत आहे, पण गदर हा एक ब्रँड आहे. यामुळेच या चित्रपटासाठी आम्ही फार मोठे बजेट ठेवले नाही. आम्ही हा चित्रपट फक्त 60 कोटींच्या बजेटमध्ये बनवला.

अनिल शर्मा यांनी पुढे बोलताना सांगितलं की, गदर पाहणाऱ्यांची संख्या जवळपास 175 दशलक्ष होती. मला खात्री आहे की 50 दशलक्ष लोकांपैकी अजूनही गदर बघायला आवडेल. त्यामुळेच मी चित्रपटाच्या कथेशी तडजोड करायला तयार नव्हतो. आम्ही बनवलेल्या कथेशी प्रेक्षक जोडले जावेत, म्हणूनच हा चित्रपट बनवायला आम्हाला इतकी वर्षे लागली.

गदर 2 च्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 522 कोटींचा व्यवसाय केला आहे. गदर 2 बॉक्स ऑफिसवर सातत्याने नवनवे रेकॉर्ड बनवत आहे.