Housefull 4 Trailer: 200 वर्षांपूर्वीचा काळ विनोदी रुपात मांडून हसून लोट पोट करणारा हाऊसफुल 4 चा ट्रेलर प्रदर्शित
HF4 Trailer (Photo Credits: YouTube)

गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला हाऊसफुल 4 (Housefull 4) चा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. साजिद नाडियादवाला निर्मित या चित्रपटात अक्षय कुमार (Akshay Kumar) , रितेश देशमुख (Ritesh Deshmukh), बॉबी देओल (Bobby Deol), राणा डग्गुबत्ती (Rana Daggubati), क्रिती सनॉन (Kriti Sanon), पूजा हेगडे (Pooja Hegde) अशी भन्नाट स्टारकास्ट असणार आहे. हा चित्रपट येत्या 25 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये 200 वर्षांपूर्वीचा काळ दाखविण्यात आला आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सर्वच कलाकारांचा लूक हा खूपच वेगळा आणि हटके असा दिसत आहे. तसेच प्रत्येकाची भूमिका आणि कॉमिक टायमिंगही खूप भन्नाट असेल असे दिसते आहे.

पाहा हाऊसफुल 4 चा ट्रेलर:

या ट्रेलरमध्ये 200 वर्षांपूर्वीचा काळ अवतरण्यासाठी मोठमोठाले सेट्स पाहायला मिळत आहे. 25 सप्टेंबरला या चित्रपटातील कलाकारांनी आपल्या चित्रपटातील लूक सोशल मिडियावर शेअर करत या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता वाढवली होती. हेही वाचा- Housefull 4 First Look: हाऊसफुल 4 चा फर्स्ट लूक प्रदर्शित, या आधी कधीही पाहिलं नसाल अशा अवतारात दिसतील अक्षय कुमार आणि रितेश देशमुख

त्यात आता हा धमाकेदार ट्रेलर पाहून प्रेक्षकांमधील या चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीनच वाढली असून हा चित्रपट कधी प्रदर्शित होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा हास्यसम्राट जॉनी लिव्हर (Johny Lever) आणि त्याची मुलगी जेमी लिव्हरसुद्धा पाहायला मिळणार आहे. बाबाच्या भूमिकेत असलेला नवाजुद्दीनचा ह्या चित्रपटात काय लूक आणि कशी भूमिका असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.